शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भिक्षा मागितली तर काय गुन्हा केला... मुलाची हत्या का केली...?  मातेचा आर्त टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 11:52 IST

Crime News : भिक्षा मागणे हा काय? गुन्हा आहे काय? असा आर्त टाहो रायगड जिल्ह्यात हत्या करण्यात आलेल्या नाथजोगी समाजाच्या इसमाच्या आईने फोडला.

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : आमच्या कुटुंबातील तरूण बहुरूपींचा वेश परिधान करून गावोगावी फिरून भिक्षा मागतात. हे आमचे परंपरागत काम असून, अनेक वर्षांपासून आम्ही अशा प्रकारे भिक्षा मागत आहोत. मात्र भिक्षा मागण्यासाठी गेल्यावर माझ्या मुलाची हत्या करण्यात आली, भिक्षा मागणे हा काय? गुन्हा आहे काय? असा आर्त टाहो रायगड जिल्ह्यात हत्या करण्यात आलेल्या नाथजोगी समाजाच्या इसमाच्या आईने फोडला.जळगाव जामोद तालुक्यातील मोहीदपूर व नाव खुर्द या गावात नाथजोगी समाजाचे नागरिक  वास्तव्यास आहेत. या समाजातील तरूण बहुरूप्यांचा वेश परिधान करून गावोगावी जाऊन भिक्षा मागतात. अनेक वर्षांपासून पिढ्यांन पिढ्यांपासून ते हेच काम करीत आहेत. अशाच प्रकारे तेजराव शालीग्राम सोळंके व तेजराव वामन चव्हाण त्यांच्या पत्नीसह रायगड जिल्ह्यात गेले होते. तेथे तेजराव सोळंके व तेजराव चव्हाण भिक्षा मागण्याकरिता गावोगावी फिरत होते, सायंकाळी ते परत आपल्या ठिकाण्यावर येत होते. मात्र, १९ जून रोजी तेजराव सोळंके परतलेच नाहीत. त्यांचा तेजराव चव्हाण व पत्नी सुनीता यांनी शोध घेतला. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये हरविल्याची माहिती दिली. त्यानंतर उरण पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तेजराव चव्हाण सापडल्याची माहिती दिली. तेजराव चव्हाण व सुनीता उरणच्या रूग्णालयात पोहोचले तर तेथे तेजराव सोळंके यांचा मृतदेहच त्यांना बघायला मिळाला. त्यांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. संपूर्ण शरीरावर मारहाण झाल्याचे दिसत होते. त्यानंतर तेजरावचा मृतदेह घेऊन पत्नी सुनीता व सहकारी मोहीदपूर गावात पोहोचले. गावात मुलाचा मृतदेह बघितल्यावर आई रेश्मा यांनी एकच हंबरडा फोडला. संपूर्ण गावावरच दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, दु:खापेक्षाही त्यांच्या मनात चीड होती, ती कोणता गुन्हा केला याची?  यापूर्वीही याची? गावातील तिघांची नागपूर येथे हत्या करण्यात आली होती. या घटनांमुळे  समाजातील अनेकांनी रोष व्यक्त केला.

गुन्हा केला असेल तर पोलिसात द्या, हत्या का करता? आमच्या समाजातील तरूण गावोगावी फिरतात. महिला व बहुरूप्यांचे वेश परिधान करतात. यात काय चुकीचे आहे? त्यांनी गुन्हा केला असेल तर पोलिसांकडे तक्रार करा, त्यांना पकडून द्या, त्यांना कायद्याने शिक्षा होऊ द्या, मात्र त्यांचे काहीही ऐकून न घेता चक्क हत्या का करता? देशात कायदा आहे? की नाही, हत्या करण्याएवढा कोणता गुन्हा ते करतात, असा सवाल मोहीदपूर गावातील महिलांनी केला आहे. 

दहा दिवसांपासून पोलिसांचा तक्रार घेण्यास नकार तेजराव सोळंके यांची रायगड जिल्ह्यात उरण येथे हत्या झाली. मात्र, उरण पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार देत, गावाला जावून तक्रार देण्याचे सांगितले. तेजराव यांचे नातेवाईक जळगाव जामोेद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांनी घटना उरण येथे घडली आहे, त्यामुळे तेथेच तक्रार देण्याचे सांगितले. घटना घडून दहा दिवस झाले तरी पोलीस तक्रार घेण्यास तयार नाहीत.

नागपूर येथे तीन तर राईनपाडा येथे पाच जणांची झाली होती हत्या मोहीदपूर येथील तीन तरूणांची नागपूर येथे ९ मे २०१२ रोजी हत्या झाली होती. यावेळी अनेक आरोप हत्या झालेल्यांवर करण्यात आले होते. तसेच धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे १ ऑगस्ट २०१८ रोजी नाथजोगी समाजातील पाच जणांची हत्या करण्यात आली. यांच्यावरही विविध आरोप करण्यात आले होते. संशयातून या समाजातील नागरिकांची हत्या करण्यात येत आहे.  

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी