शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ज्याच्या अंत्यसंस्काराची सुरू होती तयारी; तोच युवक गर्लफ्रेंडसोबत जिवंत सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 15:21 IST

९ सप्टेंबर रोजी मेरठच्या दौराला भागात डोके आणि हात कापलेले एक मृतदेह आढळून आला होता.

मेरठ - उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एका नाल्यातून पोलिसांना डोके व हात नसलेला मृतदेह सापडला होता. शेजारील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बेपत्ता तरुण म्हणून त्याची ओळख पटली परंतु अंत्यसंस्काराच्या काही तासांपूर्वी चंदीगडमध्ये हा युवक त्याच्या गर्लफ्रेंडसोबत  जिवंत सापडला. त्यानंतर नाल्यात सापडलेला मृतदेह आता मेरठ पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

९ सप्टेंबर रोजी मेरठच्या दौराला भागात डोके आणि हात कापलेले एक मृतदेह आढळून आला होता. मेरठ पोलिसांनी वायरलेसवर संदेश दिल्यानंतर मुझफ्फरनगर पोलीस सतर्क झाले. काही दिवसांपूर्वी मुझफ्फरनगरच्या मन्सूरपूर भागात एका कुटुंबाचा २० वर्षांचा मुलगा मॉन्टी कुमार बेपत्ता झाला होता. पोलिसांनी तात्काळ कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीय मेरठमधील पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचले. त्यांच्या बेपत्ता मुलाच्या मानेवर आणि हातावर टॅटू असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्याची ओळख लपवण्यासाठी मारेकऱ्यांनी शरीराचे हे अवयव कापले असण्याची शक्यता आहे. या आधारे कुटुंबीयांनी मृतदेह मॉन्टी कुमारचा असल्याचे म्हटलं.

यानंतर हा मृतदेह मुझफ्फरनगरला आणण्यात आला आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. दरम्यान, माँटी कुमार हा चंदीगडमध्ये १८ वर्षीय तरुणीसोबत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रेमप्रकरणामुळे मुलगी माँटीसोबत घरातून पळून गेली होती. तर मुलीच्या कुटुंबीयांनी मन्सूरपूर पोलिस ठाण्यात माँटीविरुद्ध अपहरणाचा एफआयआर दाखल केला होता.

मन्सूरपूरचे एसएचओ आशिष चौधरी यांनी सांगितले की, आम्ही मोबाईल फोनच्या तपासणीनंतर मॉन्टी आणि मुलीचा शोध घेत होतो. कुटुंबियांनी ज्या मृतदेहावर दावा केला तो घरातील बेपत्ता युवक नव्हता. त्यामुळे मेरठ पोलिसांनी मृतदेह पुन्हा शवागारात आणला. मी सकाळी उठलो तेव्हा माझी मुलगी घरी नव्हती. एका शेजाऱ्याने मला सांगितले की मॉन्टीने तिला मोटारसायकलवरून सोबत नेले होते. तिने सोबत दागिने आणि ५० हजार रुपये घेतले होते. यानंतर आम्ही ३१ ऑगस्ट रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली असं मुलीच्या वडिलांनी सांगितले.  दुसरीकडे, नोना गावचे प्रमुख रॉबिन चौधरी म्हणाले की, जेव्हा मॉन्टी कुमारच्या कुटुंबीयांना मेरठमध्ये मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांना वाटले की हा मृतदेह त्यांच्या मुलाचा आहे. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिस पुरेसे काम करत नसल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलनही केले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी