शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

मॉलमध्ये झाली ओळख, मैत्री अन्...; एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते महालक्ष्मी आणि मुक्ती रंजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 17:27 IST

महालक्ष्मी विवाहित होती, पण पतीपासून वेगळी राहत होती.

बंगळुरूमध्ये एका इमारतीच्या प्लॅटमध्ये महालक्ष्मी नावाच्या महिलेची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे महालक्ष्मीच्या मृतदेहाचे ४० तुकडे करण्यात आले. हे तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. घरातून दुर्गंधी येत असल्याचं समजल्यावर शेजाऱ्यांनी महालक्ष्मीच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर तिची आई घरी पोहोचली. घरातील फ्रिज उघडल्यावर सर्वांना धक्काच बसला. 

महालक्ष्मी विवाहित होती, पण पतीपासून वेगळी राहत होती. पतीने अशरफ नावाच्या व्यक्तीसोबत पत्नीचं अफेअर असल्याचा आणि त्यानेच तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला होता. पण नंतर पोलिसांनी महालक्ष्मीच्या मारेकऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपी हा कोणीतरी बाहेरची व्यक्ती असल्याचं समजलं.

मुक्ती रंजन असं आरोपीचं नाव असून तो ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील धुसुरी या गावचा रहिवासी होता. त्यानेच महालक्ष्मीची हत्या केली आणि नंतर स्वत: आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी मुक्ती रंजन कामाच्या शोधात बंगळुरूला आला आणि इथल्या एका मॉलमध्ये कपड्याच्या दुकानात काम करू लागला.

एक वर्षापूर्वी २०२३ मध्ये मुक्ती रंजन आणि महालक्ष्मी बंगळुरूमधील एका मॉलमध्ये भेटले, ओळख झाली आणि त्यानंतर ते एकमेकांशी बोलू लागले. कौटुंबिक वादामुळे पतीपासून दूर झालेल्या महालक्ष्मीने त्याच मॉलमधील कॉस्च्युम आउटलेटमध्ये टीम लीडर म्हणून काम केलं. मुक्ती रंजन याच्याशी तिचा संवाद वाढत गेला आणि दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली.

मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. ते एक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. महालक्ष्मी मला आवडायची असं मुक्ती रंजनने आत्महत्येआधी सांगितलं आहे. तसेच ती आपली फसवणूक करत असल्याने रागाच्या भरात तिची हत्या करून तुकडे केल्याचं देखील त्याने कबूल केलं. त्याने आपल्या आईसोर महालक्ष्मीची हत्या केल्याचं सांगितलं. यानंतर त्याने आत्महत्या केली आहे. 

"माझं महालक्ष्मीवर प्रेम होतं, पण ती मला..."; मुक्ती रंजनने आईसमोर दिली हत्येची कबुली

पोलिसांना सापडलेल्या मुक्ती रंजनच्या सुसाईड नोटमध्ये त्याने बहुतांश ठिकाणी इंग्रजी तर काही ठिकाणी ओडिया भाषेचा वापर केला आहे. महालक्ष्मीच्या हत्येची कबुली देताना मुक्ती रंजनने लिहिलं की, "मला ती आवडायची, माझं तिच्यावर प्रेम होतं, पण तिची माझ्यासोबतची वागणूक चांगली नव्हती. ती मला किडनॅपिंगच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत ​​असे. मी खूप पैसेही खर्च केले." 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी