शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे ब्राउन शुगर भाभी? माहेरपासून सासरपर्यंत सगळेच धंद्यात सहभागी; मुलींचा करत होती वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 15:25 IST

बिहारच्या सासाराम जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनजवळील कारगर गावात राहणारी रूबी मागील १० वर्षापासून ड्रग्स व्यवसायात आहे

नवी दिल्ली - रूबी सिंह उर्फ ब्राउन शुगर भाभी...बिहारच्या सासाराम जिल्ह्यात रूबीच्या नावावर २० गुन्हे दाखल आहेत. एकाच पोलीस ठाण्यात १३ गुन्हे दाखल आहेत. तिच्या माहेरपासून सासरी कुटुंबातील सर्वच लोक बेकायदेशीर व्यवसायात सहभागी आहेत. गेल्या १० वर्षापासून ते हा व्यवसाय करतात. आसपासच्या अनेक जिल्ह्यात त्यांचे नेटवर्क पसरले आहे. केवळ पुरुषच नाही तर मुलीही या धंद्यात सहभागी आहेत. पोलिसांनी जेव्हा या नेटवर्कचा पर्दाफाश केला तेव्हा चौकशीत जे समोर आले त्याने बरीच रहस्य उलगडली. 

आपल्या घरातून ब्राउन शुगर म्हणजे ड्रग्सचा व्यवसाय करणारी रूबी सिंह सध्या पोलीस कोठडीत आहे. रूबी यूपीतून ब्राउन शुगर आणून त्यात नशेची पावडर मिसळत होती. त्यानंतर हे ड्रग्स आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पाठवायची. बिहारमध्ये राहणाऱ्या रूबीचा ड्रग्सचा कारभार झारखंडची राजधानी रांचीपासून प्रत्येक भागात पसरला आहे. सर्वात आधी ब्राउन शुगर भाभी नावाने प्रसिद्ध असलेली रूबी सिंह कोण आहे हे जाणून घेऊ.

बिहारच्या सासाराम जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनजवळील कारगर गावात राहणारी रूबी मागील १० वर्षापासून ड्रग्स व्यवसायात आहे. तिचा भाऊ पिंटू साह, छोट्या बहिणीचा नवरा प्रिंस, दीर सूरज कुमार साहसोबतच संपूर्ण कुटुंब या धंद्यात सहभागी आहे. बिहारमध्ये राहून रूबीने तिचा व्यवसाय झारखंडच्या रांचीपर्यंत पोहचवला आहे. रांचीच्या प्रत्येक भागात ती ब्राउन शुगर खरेदी करते. त्यातून तिच्यावर २० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत परंतु गुन्हेगारी क्षेत्रात तिचे पाऊल थांबले नाही. रांचीच्या सुखदेवनगर पोलीस ठाण्यात १३, कोतवालीत २, लोअर बाजार २, खेलगाव, जगन्नाथपूरच्या पुदांग आणि अरगोडासह अनेक ठाण्यात तिच्यावर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी तपासाचा फास आवळल्यानंतर तिने २९ एप्रिलला सरेंडर केले. 

पोलिसांनी रूबी सिंहला कोर्टात हजर केल्यानंतर तिला ३ दिवसांची रिमांड मिळाली. त्यानंतर पोलिसांना तिच्या चौकशीत धक्कादायक खुलासे समजले. ब्राउन शुगरचा तिचा धंदा मुली सांभाळत होत्या. मुलींना यात सहभागी करण्याचा हेतू असा होता की कुणालाही त्यांच्यावर संशय येणार नाही. अलीकडेच ड्रग्स रॅकेट प्रकरणात एका महिलेला पोलिसांनी अटक केली होती. तिच्या जवळून पोलिसांनी जवळपास ४ लाख ५० हजार रूपये आणि ८८ ग्रॅम ब्राउन शुगर जप्त केली होती. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारी