शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

घर साफ करताना तिने केली पत्नी असल्याची बतावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 00:19 IST

चोरीचा नवीन फंडा कल्याणमध्ये उघड झाला आहे. चोरट्या तरुणीने घराचे कुलूप तोडून आतील एक लाख ५८ हजारांचा ऐवज लंपास केला. मात्र, त्याचदरम्यान घरमालकाने आॅनलाइन मागवलेली वस्तू कुरिअर बॉय घरी घेऊन आला.

कल्याण : चोरीचा नवीन फंडा कल्याणमध्ये उघड झाला आहे. चोरट्या तरुणीने घराचे कुलूप तोडून आतील एक लाख ५८ हजारांचा ऐवज लंपास केला. मात्र, त्याचदरम्यान घरमालकाने आॅनलाइन मागवलेली वस्तू कुरिअर बॉय घरी घेऊन आला. चोरट्या तरुणीने आपण त्या व्यक्तीची पत्नी असल्याचे सांगत त्याच्याकडून पार्सल स्वीकारले. या आॅनलाइन आॅर्डरमुळेच चोरीचा प्रकार उघड झाला आहे.खडकपाडा परिसरात श्याम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या विपुल होवाळ (३३) यांनी आॅनलाइनद्वारे भिंतीवरील दोन घड्याळांची आॅर्डर १० नोव्हेंबरला नोंदवली होती. त्यांनी ही वस्तू कल्याण आणि कांदिवली अशा दोन ठिकाणी मागवली होती. १३ नोव्हेंबरला सकाळी ८ च्या सुमारास होवाळ हे कल्याण येथील घरी आले. त्यावेळी त्यांना आॅर्डर दिलेले घड्याळ घरातील सोफ्यावर आढळले. घरात कोणी नसताना आॅर्डर कोणी घेतली, असा प्रश्न होवाळ यांना पडला. त्यामुळे त्यांनी संबंधित कंपनी आणि कंपनीच्या एजन्सीकडे माहिती काढली. घड्याळे घरपोच देणाºया कुरिअर बॉयने होवाळ यांना सांगितले की, ‘मी १३ नोव्हेंबरला दुपारी २ च्या सुमारास घरी गेलो होतो. त्यावेळी, घरातील मुलीने कुरिअर घेण्यास नकार दिला. माझे पती घरात नसल्याने ती वस्तू शेजाºयांकडे द्या, असे ती म्हणाली. त्यावर, आम्ही शेजारी वस्तू देत नाही. आॅर्डर करणाºयालाच देतो, असे मी तिला सांगताच तिने पार्सल स्वीकारले.’पोलिसांकडे तक्रारहोवाळ यांचे पार्सल तरुणीने स्वीकारल्याची माहिती कुरिअर बॉयने दिली. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी कपाट तपासले असता एक लाख ५८ हजार रुपयांचे दागिने चोरी झाल्याचे समजले. तरुणीच्या विरोधात त्यांनी खडकपाडा पोलिसांकडे तक्रार दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी