शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य आरोपी परमबीर सिंग आहेत कुठे?; वकीलाची न्यायालयात विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 21:09 IST

Parambir Singh : राज्य सरकारला दणका; परमबीर सिंग खंडणी प्रकरणातील दोघांची जामीनावर सुटका

ठळक मुद्देयाच दोघांच्या जामीनावर युक्तिवाद करतांना अॅड. शैलेश सडेकर यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, मुंबई ठाण्यात तीन ठिकाणी परमबीर सिंग यांच्याविरुद्धही खंडणीचा गुन्हा दाखल आहे.

ठाणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध मुंबई आणि ठाण्यात खंडणीचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. सिंग यांच्याबद्दलची काहीच माहिती पोलिसांना नाही. पण, सह आरोपी 50 दिवसांपासून कारागृहात आहेत. त्यामुळेच त्यांची जामीनावर सुटका करण्यात यावी, अशी मागणी केल्यानंतर काही अटी शर्थीवर ठाण्याचे सत्र न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी सुनिल जैन आणि संजय पुनामिया या आरोपींची बुधवारी जामीनावर सुटका केली.     

परमबीर सिंग यांच्यासह तत्कालीन ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणोरे, संजय पुनामिया, सुनिल जैन आणि मनोज घोटकर अशा पाच जणांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात चार कोटी 68 लाखांच्या खंडणी प्रकरणी 24 जुलै 2021 रोजी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतही सिंग यांच्यासह आठ जणांविरुद्ध मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर असाच गुन्हा ठाण्यातील ठाणोनगर पोलीस ठाण्यातही सिंग यांच्यासह 29 जणांविरुद्ध दाखल आहे. जैन आणि पुनामिया यांना सुरुवातीला मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली होती. त्यापाठोपाठ कोपरी पोलिसांनीही अटक केली. याच दोघांच्या जामीनावर युक्तिवाद करतांना अॅड. शैलेश सडेकर यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, मुंबई ठाण्यात तीन ठिकाणी परमबीर सिंग यांच्याविरुद्धही खंडणीचा गुन्हा दाखल आहे.

ते यात मुख्य आरोपी आहेत. मरीन ड्राईव्हमध्ये 21 जुलै रोजी शामसुंदर अग्रवाल यांनी तर त्यांचे पुतणो शरद अग्रवाल यांनी  23 जुलै रोजी कोपरीमध्ये गुन्हा दाखल केला आहे. मुळात, ज्या मालमत्ता जैन आणि पुनामिया यांनी घेतल्याचा आरोप आहे, त्याबाबाबत  दिवाणी न्यायालयात दावे दाखल होते. न्यायालयाच्याच आदेशाने 2017 मध्ये मीरा भाईंदरमधील ती मालमत्ता संजय पुनामिया आणि जैन यांच्या नावे झाली आहे. मग, ती खंडणी कशी होऊ शकते? शिवाय, मुख्य आरोपी परमबीर सिंग हे कुठे आहेत? त्यांच्या शोधासाठी काय प्रय} झाले? याचे पोलिसांकडे उत्तर नाही. तर दुसरीकडे जैन आणि पुनामिया हे 50 दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळेच त्यांना जामीन मिळावा, असा युक्तिवाद अॅड. सडेकर यांनी केला. त्यावर न्यायालयाने पुनामिया आणि जैन यांना पोलिसांना तपासात सहकार्य करण्याच्या, परदेशात न जाण्याच्या अटीवर एक लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. विशेष सरकारी वकील म्हणून शेखर जगताप यांनी काम पाहिले.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगthaneठाणेPoliceपोलिसCorruptionभ्रष्टाचारCourtन्यायालयExtortionखंडणी