शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र कधी साधणार ‘गोल्डन अवर’?; सायबर गुन्ह्यांत ५ वर्षांत ९ हजार कोटी गमावले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 07:35 IST

गेल्या पाच वर्षांत राज्यात नऊ हजार कोटींहून अधिक रक्कम सायबर ठगांनी लंपास केली. त्यापैकी जवळपास एक हजार कोटी रुपये वाचविण्यात सायबर सेलला यश आले.

मुंबई - सायबर आर्थिक फसवणूक प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई करून पैसे परत मिळवण्यात उत्तर प्रदेशने मोठी झेप घेत देशात तिसरे स्थान मिळवले, तर महाराष्ट्र २२व्या क्रमांकावर असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या ‘नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल’च्या जानेवारी २०२६ मधील आकडेवारीतून स्पष्ट झाले.

सायबर गुन्ह्यातील आर्थिक लूट रोखायची असेल तर ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा असतो. महाराष्ट्राला हा ‘गोल्डन अवर’ साधायचा असेल तर नागरिकांचा पुढाकार महत्त्वाचा आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यात नऊ हजार कोटींहून अधिक रक्कम सायबर ठगांनी लंपास केली. त्यापैकी जवळपास एक हजार कोटी रुपये वाचविण्यात सायबर सेलला यश आले.

उत्तर प्रदेश तिसऱ्या स्थानावर कसे? राज्यात जानेवारी २०२६ मध्ये सायबर फसवणुत १३८ कोटी सायबर ठगांनी लाटली. त्यापैकी ४८ कोटी गोठवले. यामुळे वसुली दर ३५.१३ टक्के झाला आणि ते देशात तिसऱ्या क्रमांकावर आले. 

महाराष्ट्रातून सर्वाधिक सायबर फसवणूक  महाराष्ट्रातील नागरिकांची गेल्या वर्षभरात ३,२०३  कोटी रुपयांची लूट. कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर...तेथून २,४१३ कोटी रुपये लंपास.   तमिळनाडूमधून सायबर ठगांनी १,८९७ कोटी रुपये लांबविले. उत्तर प्रदेशात १,४४३ कोटी रुपये विविध फसवणूक प्रकरणांतून लांबवण्यात आले. तेलंगणामधील नागरिकांची १,३७२ कोटी रुपयांची लूट करण्यात आली.  या पाच राज्यांमधील एकूण नुकसान देशातील एकूण फसवणुकीच्या रकमेपैकी निम्म्याहून जास्त आहे.

जनजागृती ठरतेय प्रभावहीन?

मोबाइल कॉलर ट्यूनपासून जनजागृतीपर जाहिराती केल्या जात आहेत. बँका ग्राहकांना एसएमएस पाठवतात. अनेक हेल्पलाइनही आहेत. तरीही डॉक्टर, वकील, इंजिनिअर, मोठ्या हुद्द्यावरील शासकीय अधिकारी आदी शिक्षित, उच्च शिक्षितांनाही सायबर भामटे लक्ष्य करतात. त्यामुळे ही जनजागृती आणि उपाय प्रभावहीन ठरत आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो. प्रत्येकापर्यंत किंवा प्रत्येक वयोगटातील व्यक्तीपर्यंत पोचतोय की नाही? याची खातरजमा करणे किंवा आढावा घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra's Cybercrime Fight: Catching Up in the Golden Hour?

Web Summary : Maharashtra lags in recovering cyber fraud losses, ranking 22nd. In five years, ₹9,000 crore was stolen, with only ₹1,000 crore recovered. Uttar Pradesh excels with a 35.13% recovery rate. Awareness campaigns seem ineffective, demanding a strategic review.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम