शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

कुख्यात कडवला पोलीस कधी पकडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 20:17 IST

राजकीय घोंगडे ओढून गुंडगिरी करणाऱ्या आणि अनेकांची मालमत्ता हपडून कोट्यवधींचा मालक बनलेला कुख्यात गुंड मंगेश कडव गुन्हा दाखल होऊन तीन दिवस झाले तरी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

ठळक मुद्देचार दिवसात तीन गुन्हे : कडव मात्र फरारच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजकीय घोंगडे ओढून गुंडगिरी करणाऱ्या आणि अनेकांची मालमत्ता हपडून कोट्यवधींचा मालक बनलेला कुख्यात गुंड मंगेश कडव गुन्हा दाखल होऊन तीन दिवस झाले तरी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान, त्याच्या बचावासाठी काळ्या धंद्यात गुंतलेल्यांची एक मोठी फळीच धावपळ करीत आहे. दुसरीकडे कडवच्या पोलीस कधी मुसक्या बांधणार, असा प्रश्न चर्चेला आला आहे.कडवविरुद्ध अंबाझरी, सक्करदरा आणि बजाजनगर पोलीस ठाण्यात खंडणी वसुली, धमकावणे आणि फसवणूक करण्याचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. पहिला गुन्हा दाखल होऊन चार दिवस झाले. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर कडव त्याच्या पाठीराख्याच्या आश्रयाला गेला. रात्रभर तेथे थांबल्यानंतर कडवला भल्या पहाटे ‘तुमसर’कडून वाट दाखविण्यात आली. त्यावेळीपासून कडव गायब झाला तो पोलिसांना सापडलाच नाही. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी ‘तुमसर’च्या वाटेवरील अनेकांची चौकशी केली. परंतु त्यांनी कडवबद्दलची ठोस माहिती पोलिसांना मिळणार नाही, याची तसदी घेतली. त्यामुळे पोलिसांनी आता कडवला शोधण्यासाठी दुसरा मार्ग चोखाळला आहे. तो कुठे कुठे लपू शकतो, ते स्पॉट पोलिसांनी कागदावर घेतले असून, त्या त्या ठिकाणांवर पोलिसांनी नजर रोखली आहे. कडव गायब होण्याच्या आणि पळून जाण्याच्या दोन्ही पर्यायावर विचार करून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, कडव मंगळवारी नागपुरातून बाहेर पळून गेल्याची त्याच्याशी संबंधित वर्तुळात चर्चा आहे. दुसरीकडे तो नागपुरातच दडून असल्याचेही बोलले जात आहे.दुसरीकडे कडवने कायद्याच्या कचाट्यातून आपली मानगूट सोडवून घेण्यासाठी अटकपूर्व जामीन मिळवण्याचे प्रयत्न चालविले आहे. साथीदारांच्या माध्यमातून तो जवळीक असलेल्या अनेकांशी संपर्क करून कायदेशीर सल्ला घेत आहे.अधिकाऱ्यांच्या बैठकीतही कडवशहरातील गुन्हेगारी आणि पुलिसिंग यासंबंधाने आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. या बैठकीतही मंगेश कडव प्रकरणावर प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती आहे.सिनेमातील गुंडासारखे कडवचे साम्राज्यविशेष म्हणजे, शहरातील अनेक गुंडांसोबतही कडवचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. चार वर्षांपूर्वी कुख्यात गुंड संतोष आंबेकरसाठी आयोजित केलेली बर्थ डे पार्टी त्याच्या गळ्यातील हड्डी बनली होती. त्यावेळी त्याने अनेकांना पद्धतशीर मॅनेज करून स्वत:ला कारवाईपासून दूर ठेवले होते.आलिशान वाहनांचा मालककडवजवळ आजघडीला अनेक महागडी आणि आलिशान वाहने आहेत. त्यात बीएमडब्ल्यू, ऑडी, मर्सिडीजसारख्या कारचाही समावेश आहे. त्याच्याकडे हार्ले डेवीडसन ही महागडी बाईकही आहे. त्याने ही आलिशान वाहने विकत घेण्यासाठी कोणते कष्ट घेतले, याचा पोलिसांनी कसून तपास केल्यास आणखी दोन-तीन गुन्हे दाखल होऊ शकतात.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाExtortionखंडणी