शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तिच्यासाठी कायपण! गर्लफ्रेंडने बाईक नाही म्हणून टोमणा मारला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 21:19 IST

दोघेही द्वारकाच्या भगवती गार्डन आणि बिंदापूर भागातील रहिवासी आहेत.

ठळक मुद्देअटक चोरांपैकी एका ललित नावाच्या गर्लफ्रेंडने व्हॅलेंटाईन डेला ललितकडे बाईक नसल्याने त्यांना असा टोमणा मारला की ललित हा त्याचा साथीदार शाहिदसह दुचाकी चोरी करू लागला आणि त्याने अनेक दुचाकी चोरल्या. राग मनात ठेवून त्यांनी वेगवेगळ्या बाईक आणि स्कूटीवरून गर्लफ्रेंड फिरवण्याचा प्लॅन केला.

नवी दिल्ली - दिल्लीतील द्वारका जिल्ह्यातील विशेष पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने दोन दुचाकी चोर मित्रांना अटक केली आहे. त्यांनी आतापर्यंत वाहन चोरीच्या ९ घटनांना लगाम दिला आहे. पोलिसांच्या पथकाने त्यांच्याकडील चोरीच्या बाईक व स्कूटी जप्त केल्या आहेत. अटक चोरांपैकी एका ललित नावाच्या गर्लफ्रेंडने व्हॅलेंटाईन डेला ललितकडे बाईक नसल्याने त्यांना असा टोमणा मारला की ललित हा त्याचा साथीदार शाहिदसह दुचाकी चोरी करू लागला आणि त्याने अनेक दुचाकी चोरल्या. 

पोलिसांनी अटक केलेल्या या दोन चोरट्यांनी नावे ललित आणि शाहिद अशी आहेत. दोघेही द्वारकाच्या भगवती गार्डन आणि बिंदापूर भागातील रहिवासी आहेत. पोलीस पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली आहे. हे चोरटे दुचाकीवरून सेक्टर ३ मधील जेजे कॉलनीत फिरत असताना पोलिसांनी अटक केली आहे. सुरुवातीच्या तपासात पोलीस पथकाला हे दोघे चोरटे ज्या बाईकवर फिरत होते ती चोरीस गेली असल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या चौकशीनंतर चोरीच्या ८ दुचाकी आणि स्कूटी जप्त केल्या. दोघांनीही द्वारकाच्या वेगवेगळ्या पोलीस ठाणे हद्दीतून ही चोरी केली केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत की, त्यांनी वाहन चोरीच्या आणखी किती गुन्हे केले आहेत. याबाबत पोलीस शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वत: कडे  बाईक - स्कूटी नसल्याचे गर्लफ्रेंड टोमणा मारत असे. याचा राग मनात ठेवून त्यांनी वेगवेगळ्या बाईक आणि स्कूटीवरून गर्लफ्रेंड फिरवण्याचा प्लॅन केला. म्हणून त्यानंतर या दोघांनी एकत्र मिळून  वाहन चोरीस सुरुवात केली असल्याचे पोलिसांना चोरट्यांनी सांगितले. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसdelhiदिल्लीRobberyचोरी