शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कॅसिनो, ड्रग्ज, हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचे कनेक्शन काय? उलटसुलट चर्चा; अधिकाऱ्यांचे मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 06:03 IST

छोट्याशा गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचाही व्यवहार होतो. त्याचे आणि कॅसिनोचे काही कनेक्शन असल्याचीही चर्चा सर्वत्र ऐकायला मिळते.

नरेश डोंगरे / आशिष रॉयलोकमत न्यूज नेटवर्कपणजी (गोवा) : पणजीतील मांडवी नदीपात्रावर सुरू असलेल्या कॅसिनोतील जुगार, नृत्य अन् अन्य बाबींच्या संबंधाने सर्वत्र उलटसुलट चर्चा आहे. दुसरीकडे निसर्गाने भरभरून दिलेल्या छोट्याशा गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचाही व्यवहार होतो. त्याचे आणि कॅसिनोचे काही कनेक्शन असल्याचीही चर्चा सर्वत्र ऐकायला मिळते. त्याला अधिकृत दुजोरा मिळत नसला तरी अमली पदार्थासोबतच हायप्रोफाईल वेश्याव्यवसायही कनेक्ट असल्याचे सांगितले जाते. 

गोव्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची तस्करी आणि व्यवसाय होतो. अमली पदार्थ प्रतिबंधक विभाग(एनडीपीएस, एनसीबी)कडून वेळोवेळी कारवाई करून त्याचा पर्दाफाशही केला जातो. २७ नोव्हेंबर २०२२ला एनसीबी गोव्याने गोव्यात दोन परदेशी व्यक्तींकडून १०७ एमडीएमएच्या गोळ्या, ४० ग्रॅम उच्च दर्जाचे मेफेड्रोन (एमडी) आणि ५५ ग्रॅम उच्च दर्जाचे चरस तसेच साडेचार लाखांची रोकड जप्त केली. अंबिका नामक रशियन महिला आणि तिचा ब्रिटिश साथीदार जे. ली. या दोघांना एनसीबीने अटक केली. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघे त्यांच्या साथीदारांच्या माध्यमातून ड्रग सिंडिकेट चालवित असल्याची माहिती यावेळी पुढे आली होती.  

गोव्यातील पर्यटकांना हे अमली पदार्थ पुरविण्यात येत होते, असेही स्पष्ट झाले होते. या सिंडिकेटचा कॅसिनोशी संबंध आहे की नाही, ते अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचेही धागेदोरे जुळले असल्याचे समजते. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्यांकडून याबाबत अधिकृतपणे काही सांगितले बोलले जात नाही. 

कॅसिनो संचालक काय म्हणतात ?दरम्यान, कॅसिनोचे समाजावर झालेले विपरीत परिणाम, विस्कळीत झालेले जनजीवन आणि जलजीवन तसेच कॅसिनोच्या माध्यमातून होणाऱ्या कथित गैरप्रकाराच्या संबंधाने विविध कॅसिनोच्या संचालकांची बाजू जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क केला. त्यावर ते म्हणाले...nश्रीनिवास नायक (मॅजेस्टिक प्राईड) : तुम्हाला जे छापायचे ते छापा. मला काही देणे-घेणे नाही.nगोपाळ कांडा (बिग डॅडी) : माझा एकच आहे. डेल्टीन ग्रुपचे तीन कॅसिनो आहेत. त्यामुळे आधी त्यांच्याशी बोला. नंतर माझ्याशी बोला.nआशिष कपाडिया (डेल्टीन ग्रुप) : मला माझ्या सहकाऱ्यांनी प्रकाशित झालेल्या सर्व कटिंग्स पाठविल्या आहेत. मी तुमच्या वरिष्ठांसोबत बोलणार आहे. 

टॅग्स :goaगोवा