शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पिकनिकला गेलेल्या १४ मुलींसोबत 'असं' काय घडलं, ज्यानं पायाखालची जमीनच सरकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 11:37 IST

शॉवरहेड, पिक्चर फ्रेमपासून दरवाजाच्या लॉकपर्यंत सगळीकडे मुलींनी शोध घेतला. तेव्हा बाथरूममध्ये जे काही पाहिले त्याने मुलींच्या पायाखालची जमीन सरकली.

सुट्टीच्या काळात अनेकांना फिरायला जायला आवडते. लोक इन्जॉय करण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसोबत बाहेर जातात. पर्यटनस्थळी हॉटेल अथवा एखाद्या भक्तनिवासात मुक्काम करतात. पण आता एखादा बंगला किंवा रूमही भाड्याने घेण्याचा ट्रेंड आहे. हॉटेलच्या तुलनेने हे स्वस्त आणि मस्त असल्याने अनेक पर्यटक याचा वापर करतात. परंतु हे किती घातक ठरू शकते याचा प्रत्यय एका महिलेला आला आहे. 

कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियात १४ मैत्रिणीसोबत फिरायला गेलेल्या २६ वर्षीय Kennedy CalWell सोबत जे घडले त्याने तिच्यासह तिचे फ्रेंडही घाबरले आहेत. एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीनिमित्त आलेल्या लेडीज ग्रुपमधील मुलीला घरात काहीतरी अजब घडत असल्याचा संशय आला. अशावेळी मुलींनी फ्लॅश लाईट ऑन करून घरातील कानाकोपरा शोधण्यास सुरूवात केली. 

शॉवरहेड, पिक्चर फ्रेमपासून दरवाजाच्या लॉकपर्यंत सगळीकडे मुलींनी शोध घेतला. तेव्हा बाथरूममध्ये जे काही पाहिले त्याने मुलींच्या पायाखालची जमीन सरकली. या प्रॉपर्टीच्या बाथरूममध्ये प्लग सॉकेटखाली एक छोटासा कॅमेरा होता. या कॅमेऱ्यातून अंघोळ करणाऱ्या मुलींचे नग्न व्हिडिओ कुणीतरी बनवत असल्याचे पाहून मुलींना मोठा धक्का बसला. 

खोलीत छुपे कॅमेरे कसे असतात याबाबत व्हिडिओत मुलींनी पाहिले होते. त्यामुळे ज्या घरात थांबलोय त्याची पाहणी करायला हवी असं मुलींनी ठरवले. बाथरुममध्ये मुलींना जो छुपा कॅमेरा मिळाला तो टॉयलेट सीट आणि शॉवर घेतानाचे दृश्य कैद करणारे होते. हा कॅमेरा पाहून मज्जा करण्यासाठी आलेल्या मुलींना शॉक बसला. त्यानंतर तातडीने पोलिसांना फोन करून मुलींनी हा प्रकार सांगितला. 

पोलीस घटनास्थळी आले, त्यांनी तपासणी करत घरमालकाला चौकशीला बोलावले. परंतु हा कॅमेरा मी लावला नाही असं घरमालकाने म्हटलं. याआधी इथं राहण्यासाठी आलेल्या गेस्टने हा कॅमेरा लावला असावा असा दावा मालकाने केला. मुलींच्या सतर्कतेमुळे त्यांचे व्हिडिओ बनवता आले नाहीत. मात्र अनोळखी ठिकाणी खोली घेताना रूममध्ये सर्वकाही तपासणी करणे गरजेचे आहे अन्यथा ते धोकादायक ठरू शकते असं मुलींनी म्हटलं. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून दोषींवर कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे.