शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पती झाला हैवान! 'तिने' त्याच्यासाठी घरदार सोडलं पण 'त्याने' तिलाच संपवलं, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 16:32 IST

Crime News : अनिता नावाची तरुणी तीन वर्षांपूर्वी अनिलच्या प्रेमात पडली. त्यानंतर 2019 मध्ये दोघांनी लग्न केलं. पण त्यानंतर अनिताच्या सासरच्या लोकांनी तिच्याकडे हुंड्याची मागणी सुरू केली.

नवी दिल्ली - प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. पण अनेकदा यामध्ये धक्कादायक घटना देखील घडतात. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. बॉयफ्रेंडसोबत लग्न करता यावं म्हणून एका तरुणीने कुटुंबाचा विरोध पत्करला. तसेच त्याच्यासाठी आपलं घरदार सोडलं पण त्यानेचा आता तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. लग्नानंतर तीन वर्षातच पती हैवान झाल्याचं पाहायला मिळालं. बिहारच्या बगहामध्ये नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अनिता नावाची तरुणी तीन वर्षांपूर्वी अनिलच्या प्रेमात पडली. त्यानंतर 2019 मध्ये दोघांनी लग्न केलं. पण त्यानंतर अनिताच्या सासरच्या लोकांनी तिच्याकडे हुंड्याची मागणी सुरू केली. पैशासाठी तिच्यासोबत सतत भांडण केले जाऊ लागले. तसेच तिला मारहाणही करण्यात आली. अनिलसोबत तिने लग्न केले. त्यानेच तिचा घात केला आहे. बगाहा नगर पोलीस स्टेशन हद्दीतील आनंद नगर मोहल्ला वॉर्ड क्रमांक 26 मध्ये राहणारे छोटेलाल चौधरी यांचा मुलगा अनिल चौधरी याची पत्नी अनिता देवी हिचा मृतदेह आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे. 

अनिता आणि अनिल चौधरी यांचा प्रेमप्रकरणातून विवाह झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. तरुणीचे वडील सुभाष चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, माझ्या मुलीचा हुंड्यासाठी छळ केला जात होता. तीन लाखांची मागणी केली जात होती. हुंड्याचे तीन लाख रुपये न दिल्याने सासरे छोटेलाल चौधरी, पती अनिल चौधरी आणि सासू चिंता देवी यांनी माझ्या मुलीची गळा दाबून हत्या केली असं त्यांनी सांगितलं.

घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. एसडीपीओ कैलाश प्रसाद यांनी सांगितले की, सुभाष चौधरी यांनी मुलीच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी अनिताचा पती, सासरा, सासू यांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी