शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! 'नवी नोकरी लागणार आहे...', पत्नीला असं सांगत शेजारी महिलेसोबत पळून गेला पती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 16:30 IST

Married Man run away with widow women : पीडित महिलेने सांगितलं की, तिने तिच्या पतीला सगळीकडे शोधलं, पण कुठेही सापडला नाही. काही वेळाने जेव्हा ती शेजारी राहणाऱ्या विधवा महिलेकडे गेली तेव्हा सगळं प्रकरण समोर आलं. 

पश्चिम बंगालच्या (West Bengal) हुगलीमधून अनैतिक संबंधाची एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक विवाहित व्यक्ती शेजारी राहणाऱ्या विधवा (Married Man run away with widow women) महिलेला घेऊन पळाला. या व्यक्तीच्या पत्नी पोलिसात याबाबत तक्रार दिली आहे. पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पीडित महिलेने सांगितलं की, तिने तिच्या पतीला सगळीकडे शोधलं, पण कुठेही सापडला नाही. काही वेळाने जेव्हा ती शेजारी राहणाऱ्या विधवा महिलेकडे गेली तेव्हा सगळं प्रकरण समोर आलं. 

पीडित महिलेने आपल्या तक्रारीत सांगितलं की, काही दिवसांपूर्वी तिचा पती काही महत्वाची कागदपत्र बॅगेत सांभाळून ठेवत होता. तिने पती शंभु मंडलला विचारलं की, तू असं का करत आहेस? यावर पतीने उत्तर दिलं की, एका चांगली नोकरी मिळणार आहे. मग त्याने सगळी कागदपत्रे बॅगेत भरली. तिला पतीवर जराही संशय आला नाही. नंतर दुपारी तिला पती कुठेतरी निघून गेला. बराच उशीर होऊनही तो परत आला नाही तेव्हा पत्नीने त्याचा शोध घेतला. पण तो काही सापडला नाही.

चिठ्ठीच्या माध्यमातून झाला खुलासा

जेव्हा ती पतीला शोध विधवा महिलेच्या घरी पोहोचली तेव्हा तिला तिथे एक चिठ्ठी सापडली. ज्यावर लिहिलं होतं की, ती तिच्या इच्छेने शंभु मंडलसोबत नवीन जीवनाची सुरूवात करण्यासाठी इथून पळून जात आहे. सोबतच तिने लिहिलं की, तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीतून काहीच नको. असं सांगितलं जात आहे की, शेजारी राहणाऱ्या महिलेच्या पतीचं निधन दोन वर्षाआधी झालं होतं. यानंतर शंभु मंडल आणि रीमा चौधरी यांच्यातील जवळीक वाढली होती. हळूहळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

पोलीस घेत आहेत शोध

शंभु मंडल आपल्या पत्नीला दगा देत शेजारच्या विधवा महिलेसोबत रोमान्स करत राहिला. पीडित महिलेने पोलिसांकडे आपल्या पतीला लवकरात लवकर शोधण्याची विनंती केली आहे. सोबतच पीडिता म्हणाली की,  रीमा चौधरी आणि तिच्या पतीला कठोर शिक्षा द्यावी. पोलीस दोघांनाही शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारी