शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक... लेकीच्या साखरपुड्याला आई गुपचूप गेली, नवऱ्याने फोडले डोके

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 12:07 IST

आंतरजातीय विवाहाला होता विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: लेकीचा आंतरजातीय विवाह मंजूर नसल्याने तिची आई गुपचूप तिच्या साखरपुड्याला गेली. याचा राग मनात धरून वडिलांनी तिच्या डोक्यात हातोडीने हल्ला करत तिला गंभीर जखमी केली. तसेच तिच्यावर चाकूनेही वार केले. यात गीता शेट्टी (६८) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांचे पती प्रभाकर (७९) यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गीता यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांची मुलगी प्रणिता (३८) हिचे निखिल सावे या तरुणावर प्रेम असल्याने येत्या ३० एप्रिल रोजी त्या दोघांचा प्रेम विवाह होणार होता. मात्र निखिल हा दुसऱ्या जातीचा असल्याने त्यांचे लग्न प्रभाकरला मंजूर नव्हते. त्यामुळे त्याने निखिलच्या घरी तसेच लग्नाच्या कार्यक्रमात येण्यास नकार दिला. त्यावरून गीता आणि प्रभाकर यांच्यात दोन ते तीन दिवसांपासून वाद सुरू होते आणि लग्नाला असलेला विरोध पाहता प्रभाकरचे नाव लग्न पत्रिकेत टाकण्यात आले नव्हते. दरम्यान २६ एप्रिल रोजी दुपारी २ च्या सुमारास मालाडच्या साई पॅलेस हॉटेलमध्ये प्रणिता आणि निखिलचा साखरपुडा पार पडला. मात्र याबाबत गीता यांनी प्रभाकरला काहीच सांगितले नाही. कार्यक्रम संपल्यावर,२७ एप्रिल रोजी रात्री दीडच्या सुमारास त्या प्रणिता सोबत घरी आल्या आणि प्रभाकरला जेवण वाढून झोपी गेल्या. 

झोपेत डोक्यावर बसला जोराचा फटका  रात्री ३:३० च्या सुमारास त्यांच्या डोक्यावर जोराचा फटका बसल्याने त्यांना जाग आली तेव्हा प्रभाकर हा त्यांच्या डोक्यावर हातोडीने हल्ला करत असल्याचे त्यांनी पाहिले.  त्याला बाजूला सारायचा प्रयत्न केल्यावर त्याने बेडरूममध्ये ठेवलेल्या दोरीने त्यांचा गळा आवळला व चाकूने त्यांच्यावर वार केले. आईचा आवाज ऐकून प्रणिता मदतीला धावली तेव्हा त्याने तिच्यावरही चाकूने हल्ला चढवला.  तिने प्रभाकरला पकडून शेजाऱ्यांना आवाज दिला. त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले व जखमी मायलेकींना उपचारासाठी कोकिळाबेन रुग्णालय दाखल केले. प्रभाकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई