शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मुव्ही पाहून बाहेर निघाला; पुण्यात मंगला थिएटरबाहेर तलवार, कोयत्याने वार करत एकाचा निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 09:16 IST

काही दिवसांपूर्वी कोरेगाव पार्क परिसरातील एकासोबत  भांडण झाले होते. त्यावेळी मयत म्हस्के याने आरोपी पैकी एकावर हल्ला केला होता.

किरण शिंदे 

पुणे: शिवाजीनगर परिसरातील मंगला थिएटरच्या बाहेर दहा ते बारा जणांनी तलवार आणि कोयत्याने वार करत एका तरुणाचा निर्घृण खून केला. बुधवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नितीन म्हस्के असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सागर कोळणटी, मलिक कोल्या, इम्रान शेख, पंडित कांबळे, विवेक नवघर, लॉरेन्स पिल्ले, सुशील सुर्यवंशी, बाबा आवले, आकाश गायकवाड (सर्वजण राहणार ताडीवाला रोड) या सर्वांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश आनंदा वानखेडे (वय 34, ताडीवाला रोड खड्डा झोपडपट्टी जनसेवा तरुण मंडळाजवळ पुणे) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन म्हस्के याचे काही दिवसांपूर्वी कोरेगाव पार्क परिसरातील एकासोबत  भांडण झाले होते. त्यावेळी मयत म्हस्के याने आरोपी पैकी एकावर हल्ला केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी म्हस्केचा खून करायचे ठरवले.  नितीन म्हस्के हा काल रात्री पुण्यातील मंगला टॉकीजमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्याने गदर चित्रपट पाहिला. चित्रपट रात्री 1 वाजता संपल्यानंतर म्हस्के बाहेर पडला आणि त्यावेळी 10 ते 12 जणांनी त्याला घेरले. हातात असलेल्या तलवार, पालघन, काठ्या, लोखंडी गज याचा वापर करत  म्हस्केवर सपासप वार केले. वार करून हे सर्व त्या ठिकाणाहून फरार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या म्हस्केचा यामध्ये मृत्यू झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी