शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास! पोलिसांच्या सतर्कमुळे बालविवाहाचे बिंग फुटले; उल्हासनगरात नवऱ्या मुलासह ६ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 18:59 IST

Child marriage : नवऱ्या मुलासह नवरा व नवरीचे आई-वडील व लग्न लावून देणारा धर्मगुरू यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायद्या प्रमाणे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

ठळक मुद्देउल्हासनगर कॅम्प नं-४ मधील मोर्यानगरी परिसरातील साई विहार रेसिडेन्सीच्या आवारात अल्पवयीन मुलीचे लग्न रविवारी दुपारी होत असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैलाल थोरात यांना मिळावी.

सदानंद नाईक

उल्हासनगर : शहरातील मोर्यानगरी येथे १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाहाचे बिंग पोलिसांच्या सतर्कमुळे फुटले असून अल्पवयीन नवरी मुलीची रवानगी सासर ऐवजी महिला बालविभागाच्या हॉस्टेल मध्ये झाली. तर नवऱ्या मुलासह नवरा व नवरीचे आई-वडील व लग्न लावून देणारा धर्मगुरू यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायद्या प्रमाणे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. उल्हासनगर कॅम्प नं-४ मधील मोर्यानगरी परिसरातील साई विहार रेसिडेन्सीच्या आवारात अल्पवयीन मुलीचे लग्न रविवारी दुपारी होत असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैलाल थोरात यांना मिळावी. थोरात यांनी त्वरित पोलीस पथकासह लग्नमंडप गाठले. त्यांनी नवरा मुलगा व नवरी मुलीला आपाआपली वय विचारले असता, नवरा मुलाचे वय २७ तर नवरा मुलीचे वय अवघे १३ वर्षाचे असल्याचे उघड झाले. याप्रकाराने पोलिसांना धक्का बसला. पोलिसांनी सर्वांना पोलीस ठाण्यात आणून नवरी बालवधुची रवानगी सासर ऐवजी शहरातील महिला बालविभागाच्या हॉस्टेल मध्ये केली. तर नवरा मुलगा अभिजित राजगुरू, वडील गौतम राजगुरू, आई सुनीता राजगुरू तसेच नवरी बालवधूचे वडील राहुल देवकर, आई सविता देवकर व लग्न वाहून देणारे रमेश साळवे यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून गुन्हा दाखल केला.सुशिक्षित कुटुंबा मध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याच्या घटनेचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त होत आहे. लग्न लावून देणाऱ्या धर्मगुरूंनी तरी याबाबत सतर्क राहावे. असे पोलिसांनी सांगितले. याप्रकाराने धुमधडाक्यात सुरू असलेल्या लग्न मंडपात शांततेचे सावट पसरले. तर लग्नाला आलेली मंडळीने कारवाईच्या भीतीने आपापल्या घरी जाणे पसंद केले. याप्रकरणी विठ्ठलवाडी अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Policeपोलिसulhasnagarउल्हासनगरmarriageलग्न