शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास पोलिसांनो! पूरात हरवलेल्या मोबाईलचाही पोलिसांना लावला शोध  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 20:11 IST

Lost And Found : चोरीला गेलेले व हरवलेले 27 मोबाईल नागरीकांना केले परत, खडकपाडा पोलीसांची कारवाई

ठळक मुद्देविशेष म्हणजे 2019 च्या पूरात हरवलेला मोबाईल सुद्धा पोलिसांनी शोधून काढला आहे.चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करीत पोलिसांचे आभार मानले.

कल्याण चोरीला गेलेले आणि हरवलेल्या अशा 27 महागडया मोबाईलचा शोध लावून खडकपाडा पोलिसांनी शुक्रवारी नागरिकांना परत केले. विशेष म्हणजे 2019 च्या पूरात हरवलेला मोबाईल सुद्धा पोलिसांनी शोधून काढला आहे.

चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करीत पोलिसांचे आभार मानले.कल्याण डोंबिवलीत गेल्या काही दिवसापासून मोबाईल स्नॅचिंग आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या वाढत्या चो-या पाहता कल्याणचे अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे आणि पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या नेतृत्वाखाली या गुन्हयांच्या तपासकामी विशेष पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान मध्यंतरीच्या काळात पोलिसांनी अनेक मोबाईल चोर आणि घरफोडी करणाऱ्या चोरटय़ांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल सुद्धा हस्तगत करण्यात आला आहे. कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेल्या आणि हरवलेल्या मोबाईलचा तपास सुरु होता पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हयांची उकल करताना 27 मोबाईल चोरटय़ांकडून हस्तगत केले होते. यामध्ये हरविलेले मोबाईल सुद्धा होते. शुक्रवारी उपायुक्त विवेक पानसरे आणि खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक पवार यांच्या हस्ते 27 मोबाईल नागरीकांना सुपूर्द करण्यात आले. कर्नाटकाहून एक महागडा मोबाईल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे 2019 च्या पूरात कल्याण पश्चिमेतील मोहने परिसरातील फुलेनगरमधील एका तरुणाचा मोबाईल हरविला होता. पुराच्या पाण्यात मोबाईल वाहून गेला होता. हा मोबाईल सुद्धा पोलिसांनी शोधून काढत तरुणाची बहिण ऐश्वर्या मोरे हिच्या स्वाधीन केला आहे. यापूढेही नागरीकांचे मोबाईल शोधून परत केले जातील असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Mobileमोबाइलkalyanकल्याणPoliceपोलिसRobberyचोरी