शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane: अमित शहांना फोन केल्यावर आम्हाला सोडले; नारायण राणेंची पोलिसांकडून ९ तास चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 06:46 IST

Narayan Rane, Nitesh Rane in Disha Salian Case: राणे हे शनिवारी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांचे पुत्र नीतेश हे स्वतः गाडी चालवत वडिलांना त्या ठिकाणी घेऊन आले. त्यावेळी शेकडो राणेसमर्थक उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  आमदार मुलगा नीतेश राणे यांचा सहभाग असलेल्या पत्रकार परिषदेत दिवंगत दिशा सालीयनबाबत वक्तव्य करीत शिवसेनेवर हल्लाबोल करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पुत्र नीतेश यांची मालवणी पोलिसांनी शनिवारी नऊ तास चौकशी केली. दिशाच्या पालकांनी या प्रकरणी तक्रार केल्यानंतर राणेंवर दखलपात्र गुन्हा  नोंदविला. 

 राणे हे शनिवारी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांचे पुत्र नीतेश हे स्वतः गाडी चालवत वडिलांना त्या ठिकाणी घेऊन आले. त्यावेळी शेकडो राणेसमर्थक उपस्थित होते. राणे पितापुत्रासोबत त्यांचे वकील ॲड. सतीश मानेशिंदे तसेच अंगरक्षक आणि कमांडोदेखील होते. मालवणी पोलीस ठाण्याच्या तिसऱ्या मजल्यावर राणे आणि नीतेश यांना नेण्यात आले. प्रसिद्धीमाध्यमांची मोठी गर्दी त्या ठिकाणी होती. साध्या वेशातील पोलीसही त्या ठिकाणी नजर ठेवून होते; तर भाजपचे झेंडे घेऊन कार्यकर्त्यांचा घोळका एका बाजूला जमा झाला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

  राणे यांचा जबाब घेण्यासाठी परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर तसेच क्राइमचे पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी त्या ठिकाणी हजर होते. त्यानुसार तब्बल 

नऊ तास चौकशी सुरू होती. राणे रात्री १० नंतर बाहेर आले. बाहेर असलेल्या समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत होते; तर पोलीस हे विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप मानेशिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

महापौर किशोरी पेडणेकर दिशाच्या घरी गेल्या आणि त्यांनी पालकांना तक्रार करण्यास भाग पाडले. पोलिसांनी आमची चौकशी केली. मी अमित शहा यांना फोन केला. सगळी माहिती दिली. दिशाची हत्या झाल्यानंतर मला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा दोनवेळा फोन आला. ते म्हणाले, तुम्ही याप्रकरणात बोलू नका. पण दिशाच्या हत्येबद्दल आम्ही बोलत राहणार. - नारायण राणे, केंद्रीय मंत्री

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Nitesh Raneनीतेश राणे