कर्नाटक - कर्नाटकातील दवंगेरे या परिसरात आज दोन वाहतूक पोलिसांना एका व्यक्तीने बेदम मारहाण केली आहे. अक्षरश: पोलिसाला जमिनीवर लोळवून या व्यक्तीने पोलिसांची धुलाई केली आहे. एका वाहतूक पोलिसांच्या कपाळाला या झटापटीत दुखापत झाली असल्याचे देखील या व्हिडीओत दिसत आहे. पोलिसांवर हात उगारणारी व्यक्ती ही मद्यप्राशन केलेली असल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दारुड्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
कर्नाटकात दोन वाहतूक पोलिसांची दारुड्याने केली धुलाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 18:25 IST