शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

दाऊदपेक्षा खतरनाक डॉन बनायचं होतं; अशा ड्रग पेडलरच्या NCBने आवळल्या मुसक्या 

By पूनम अपराज | Updated: February 8, 2021 18:55 IST

Drug Case : ब्राहिमविरोधात मुंबईतील स्थानिक पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादंविअन्वये खटला सुरु आहे. सध्या इब्राहिम जामिनावर बाहेर आहे. 

ठळक मुद्देइब्राहिम कासकर हे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या वडीलांचे नाव आहे. इब्राहिम आपल्या मर्सिडीज कारमधून ड्रग्स सप्लाय करत असे. ती कार एनसीबीने जप्त केली आहे. 

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) शनिवारी मुंबईतील लोखंडवाला परिसरातून एका गँगस्टरला अटक केली आहे. तो ड्रग पेडलर देखील आहे. आरोपीचे नाव इब्राहिम मुजावर असं आहे. त्याने आपलं दुसरं नाव इब्राहिम कासकर असं ठेवलं होते. इब्राहिम कासकर हे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या वडीलांचे नाव आहे. इब्राहिम आपल्या मर्सिडीज कारमधून ड्रग्स सप्लाय करत असे. ती कार एनसीबीने जप्त केली आहे. 

खरंतर, एनसीबीने दक्षिण मुंबईतील डोंगरी येथे तीन ठिकाणी छापे मारले. तेथे इब्राहिमला चरस या ड्रग्ससह अटक केली. एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासात इब्राहिमने त्याच्याकडे सापडलेला चरस हा डोंगरातील आसिफ राजकोटवालाकडून मिळाल्याची माहिती दिली. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने डोंगरी येथून आसिफ राजकोटवालाला अटक केली. आसिफकडून चरस देखील एनसीबीने जप्त केला. 

 

इब्राहिम आणि आसिफ हे गेल्या वर्षभरापासून एकमेकांसाठी ड्रग्सकरिता काम करत होते. इब्राहिमविरोधात मुंबईतील स्थानिक पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादंविअन्वये खटला सुरु आहे. सध्या इब्राहिम जामिनावर बाहेर आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे की, आसिफ आणि इब्राहिम एका मोठ्या ड्रग मोड्युलचा भाग आहेत. त्यांची चौकशी सुरु आहे. इब्राहिमसाठी काम करणाऱ्या पश्चिम उपनगरातील इतर ड्रग्स पेडलर्स यांची चौकशी देखील सुरु आहे. 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमDrugsअमली पदार्थMumbaiमुंबईNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो