शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटांवरून वाडा पोलीस लक्ष्य; अनधिकृत धंद्यांबाबत अनभिज्ञ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 00:57 IST

वाड्यात व्यक्त होतेय आश्चर्य

वाडा : वाडा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बनावट नोटांचा छापखान्याबाबत वाडा पोलिसांना काहीही माहिती नसणे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून, अनधिकृत धंद्यांबाबत वाडा पोलीस अनभिज्ञ असल्याचे दिसून येते आहे. विशेष म्हणजे वाडा पोलिसांचा गोपनीय विभाग किती दक्ष आहे हे यावरून दिसून येत आहे.

वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या अनधिकृत धंद्यांना उधाण आले आहे. गाड्यांमधून लोखंड उतरवण्याचा गोरखधंदा, मटका, जुगार, भंगार, दमणची दारू येथे आणून राजरोसपणे विकली जात आहे. असे अनेक धंदे राजरोसपणे सुरू असून पोलिसांना याबाबत काहीही माहिती नसणे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गाड्यांमधून स्टील उतरवून त्याची लगेच विल्हेवाट लावली जाते. 

तालुक्यातील काही तरुण दमणची दारू आणून येथे राजरोसपणे विकत आहेत. विशेष म्हणजे बीअर बारलासुद्धा ही दारू पुरवली जात आहे. तालुक्यात अनेक भंगारची दुकाने सुरू असून हे धंदेवाले चोरट्या लोखंडी वस्तू राजरोसपणे घेत आहेत. वाडा शहरात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी मटका जुगाराचा अड्डा आहे. या सर्वच बाबतींत पोलीस अनभिज्ञ आहेत. दरम्यान, अनधिकृत धंद्यांबाबत पोलीस डोळेझाक तर करीत नाहीत ना, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

खासदार गावितांनी पोलिसांना खडसावलेवाड्यात बनावट नोटांचा छापखाना मुंबई पोलिसांनी उघडकीस आणल्याने वाडा पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालघरचे खासदार राजेंद्र गावित हे गुरुवारी वाड्यात आढावा बैठकीसाठी आले होते. या बैठकीत गोपनीय विभागाचे पोलीस अधिकारी तुकाराम पाटील यांना खासदारांनी चांगलेच खडसावले. मुंबई पोलीस वाड्यात येऊन छापे मारून बनावट नोटांचा छापखाना उघडकीस आणत आहेत. मग, वाडा पोलीस काय करीत आहेत? ही तुमची जबाबदारी नाही का? पोलीस निरीक्षक सुधीर संख्ये काय करीत आहेत? अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना खडसावले.

टॅग्स :Policeपोलिस