शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

Deepali Chavan Suicide: विनोद शिवकुमार दारू ढोसून झोडायचा ‘मटण पार्टी’; साधे जेवण दिल्यावर करायचा चिडचिड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 11:06 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या कुठल्याही विश्रामगृह किंवा संकुलात मांसाहारी जेवणावर पूर्णत: बंदी आहे. तो एक मोठा गुन्हा असताना, निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचा हट्ट हा मटणाचे जेवण व दारू यासाठीच असायचा. 

- नरेंद्र जावरे परतवाडा (जि. अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या कुठल्याही विश्रामगृह किंवा संकुलात मांसाहारी जेवणावर पूर्णत: बंदी आहे. तो एक मोठा गुन्हा असताना, निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचा हट्ट हा मटणाचे जेवण व दारू यासाठीच असायचा. साधे जेवण दिल्यास त्याच्याकडून कर्मचाऱ्यांना उर्मट व अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची चर्चा पुढे आली आहे.

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी असलेला शिवकुमार याचे एकापेक्षा एक सुरस किस्से आता बाहेर येऊ लागले आहेत. कालपर्यंत दहशतीखाली असलेले कर्मचारी बोलू लागले आहेत.  त्याच्या जेवणाच्या फर्माईशीवर कालपर्यंत कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात असलेली चर्चा आता बाहेर येऊ लागली आहे.विश्रामगृह, कोअर क्षेत्रातील कॅम्पवर मटण पार्टीशिवकुमार हा वनमजूर, वनकर्मचाऱ्यांकडून मटणाचे जेवण बनवून घेत होता. सर्व नियम धाब्यावर बसवून दौऱ्यादरम्यान दारू ढोसत होता. हुकूमशाही गाजवायचा. उर्मट शैली व दंडेलीच्या प्रवृत्तीमुळे वनमजूर, वनकर्मचारी, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर त्याची दहशत होती. पोलीस कोठडीत पंखा, बरमुडा, मटणाची सुविधाआरोपी शिवकुमार हा धारणी पोलीस ठाण्याच्या कोठडीत चार दिवस होता. या चार दिवसांत त्याला पोलिसांनी पंखा, बरमुडा, मटणाची सुविधा कोणाच्या ‘आशीर्वादा’ने दिली, असा सवाल भाजपच्या जिल्हा अध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी मंगळवारी अमरावती येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालयात हल्लाबोल आंदोलनात उपस्थित केला. मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांनी आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या व वरिष्ठांशी संवाद साधला.

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाणAmravatiअमरावतीforestजंगल