शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

Paytm चे फाऊंडर विजय शेखर शर्मांना झाली होती अटक, नंतर मिळाला जामीन, वाचा संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 11:46 IST

पेटीएमचे फाऊंडर आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांना फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली होती अटक.

पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ (Paytm Founder and CEO) विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांना दक्षिण दिल्ली पोलिसांनी गेल्या महिन्यात अटक केल्याची माहिती समोर आली आहे. परंतु नंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली. समोर आलेल्या माहितीनुसार, विजय शेखर शर्मा यांच्या भरदाव वेगानं जाणाऱ्या जग्वार लँड रोव्हर कारने दक्षिण दिल्लीतील डीसीपींच्या कारला धडक दिली. इतकंच नाही, तर यानंतर ते आपली कार घेऊन घटनास्थळाहून निघून गेले होते.

यानंतर डीसीपींचे चालक दीपक कुमार यांनी या प्रकरणी FIR दाखल केली होती. या अपघातात त्यांना दुखापत जाली नाही. परंतु विजय शेखर शर्मा यांना वेगाने आणि निष्काळजीपणाने गाडी चालवण्याच्या आरोपाखाली २२ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधिकाऱ्यांनी गाडीच्या नंबरची नोंद केली होता. त्यानंतर त्या नंबरच्या आधारे पोलिसांनी गाडीचा शोध घेतला. तपासात ही गाडी एका कंपनीच्या नावे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या अपघाताच्या वेळी ग्रेटर कैलाश पार्ट २ मध्ये राहणारे विजय शेखर शर्मा गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर शर्मा यांना पोलीस स्थानकात बोलावण्यात आलं आणि त्यांना अटक करण्यात आली. परंतु त्यानंतर त्यांना जामिनही देण्यात आला.  विजय शेखर शर्मा हे पेटीएमचे संस्थापक आहेत. नुकतंच पेटीएमला रिझर्व्ह बँकेनंही झटका दिला होता. पेटीएम पेमेंट्स बँकेला कोणतेही नवे अकाऊंट उघडण्यावर सध्या बंदी घालण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी यासंदर्भातील आदेश दिला. "बँकिंग नियम १९४९ च्या ३५ ए अंतर्गंत पेटीएम पेमेंट्स बँकेला नवे ग्राहक जोडण्यावर तात्काळ प्रभावानं बंदी घालण्यात आली आहे," असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं होतं.

टॅग्स :Paytmपे-टीएमAccidentअपघात