शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

Vijay Mallya News: मोठी बातमी! विजय मल्ल्या ब्रिटनकडून दिवाळखोर घोषित; बँका पहिली लढाई जिंकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 21:29 IST

Vijay Mallya bankrupt in Britain: मल्ल्याच्या विरोधात स्टेट बँकेच्या नेतृत्वात अन्य बँकांनी ब्रिटिश कोर्टात एक याचिका दाखल केली होती. यामध्ये मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्सला दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी मल्ल्याला दिवाळखोर घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. 

लंडन: भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून लंडनमध्ये पळून गेलेला किंगफिशरचा विजय मल्ल्याविरोधात (Vijay Mallya) मोठा विजय मिळाला आहे. विजय मल्ल्याला लंडनच्या उच्च न्यायालयाने (UK court) सोमवारी दिवाळखोर (bankrupt) घोषित केले आहे. आता भारतीय बँका विजय मल्ल्याच्या मालमत्तांवर आरामात कब्जा करू शकणार आहेत. (Fugitive businessman Vijay Mallya was declared bankrupt by a UK court on Monday)

मल्ल्याच्या विरोधात स्टेट बँकेच्या नेतृत्वात अन्य बँकांनी ब्रिटिश कोर्टात एक याचिका दाखल केली होती. यामध्ये मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्सला दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी मल्ल्याला दिवाळखोर घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. लंडनच्या उच्च न्यायालयाचा निकाल आलेला असला तरी देखील या निर्णयाविरोधात तो एक अपील करू शकतो. यामुळे मल्ल्याचे वकील लवकरच या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. 

जुलैमध्ये विजय मल्ल्याला कर्ज देणाऱ्या बँकांनी त्याचे शेअर विकून 792.12 कोटी रुपये मिळविले होते. स्टेट बँकेच्या नेतृत्वातील बँकांकडून डेट रिकव्हरी ट्रिब्युनलने मल्ल्याचे शेअर विकले होते. ईडीने हे शेअर जप्त केले होते. या शेअरमधून आलेला पैसा बँकांचे कर्ज रिकव्हर करण्यासाठी देण्यात आला आहे. ईडीने नुकतीच याची परवानगी डीआरटीला दिली होती. 

भारतात तीन केस लढतोय मल्ल्याभारतात मल्ल्या तीन केस लढत आहे. सर्वोच्च न्यायालयात मल्ल्याने सेटलमेंट ऑफर दिली आहे. तसेच जजमेंट डेटवर लावण्यात आलेल्या 11.5 टक्के व्याजावर माल्याने आव्हान दिले आहे. तिसरी केस त्याला पळून गेलेला आर्थिक गुन्हेगार म्हणून त्याला घोषित केले होते, यावर लढत आहे.

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याCourtन्यायालयbankबँकSBIएसबीआय