शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Video : धक्कादायक! झोपेच्या गोळ्या आणि विषाचे इंजेक्शन देऊन पत्नीने पतीला संपविले; प्रियकरासोबत रचला कट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 16:40 IST

पोलिसांच्या बारकाईने केलेल्या तपासामुळे त्यांचा हा बनाव उघडकीस आला आणि या दोघांना शिताफीने अटक करण्यात आली. पतीचा मृतदेह स्कूटरवरून रुग्णालयात नेत असतानाची सीसीटीव्ही दृश्य पोलिसांसाठी तपासासाठी महत्वाचा धागादोरा ठरला आहे.

ठळक मुद्देपत्नी प्रिया हिचे महेश कराळे (25) सोबत सोशल मीडियावरुन प्रेमप्रकरण जुळले होते. प्रियाने गोपाळच्या जेवणात 30 झोपेच्या गोळ्या मिसळल्या. दोघांनी गोपाळच्या अपघाताचा बनाव करून त्याचा मृतदेह स्कूटरवरून सिव्हील रुग्णालयात आणला.

ठाणे - प्रियकरासोबत कट रचून पतीची झोपेच्या गोळ्या आणि विषाचे इंजेक्शन देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना ठाणे पोलिसांनी उघडकीस आणली आहे. पतीची हत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने त्याचा अपघात झाल्याचा बनाव रचत रुग्णालयात दाखल केले होते. पोलिसांच्या बारकाईने केलेल्या तपासामुळे त्यांचा हा बनाव उघडकीस आला आणि या दोघांना शिताफीने अटक करण्यात आली. पतीचा मृतदेह स्कूटरवरून रुग्णालयात नेत असतानाची सीसीटीव्ही दृश्य पोलिसांसाठी तपासासाठी महत्वाचा धागादोरा ठरला आहे.

गोपाळ नाईक हे ठाण्यातील गायमुख भागात रहात होते. त्यांची पत्नी प्रिया हिचे महेश कराळे (25) सोबत सोशल मीडियावरुन प्रेमप्रकरण जुळले होते. नंतर या दोघांची मजल अनैतिक संबंधांपर्यंत पोहोचली. या दोघांचे व्हिडीओ कॉलवरील संभाषण गोपाळने ऐकलं आणि याबद्दल त्याने प्रियाला जाब विचारला होता. गोपाळ आपल्या अनैतिक संबंधांच्या आड येत असल्याचं कळाल्यानंतर प्रियाने महेशच्या मदतीने गोपाळचा काटा काढण्याचं ठरवलं. गोपाळ हा जिम इन्सट्रक्टर होता आणि त्याला  ठार मारणं सोपं नाही हे प्रिया आणि महेशला माहित होतं. यावर उपाय म्हणून दोघांनी 29 डिसेंबरला गोपाळला खूप बिअर पाजली. यानंतर प्रियाने गोपाळच्या जेवणात 30 झोपेच्या गोळ्या मिसळल्या. गोपाळ पूर्णपणे बेशुद्ध झाल्याची खात्री झाल्यानंतर त्याचा जीव घेण्यासाठी प्रियाने महेशच्या मदतीने त्याला विषाचे इंजेक्शन टोचले. महेशने गोपाळच्या डोक्यावर अवजड वस्तूने वार केले आणि नंतर गळा आवळून त्याला ठार मारले. गोपाळच्या हत्येचा आरोप आपल्यावर येऊ नये म्हणून दोघांनी गोपाळच्या अपघाताचा बनाव करून त्याचा मृतदेह स्कूटरवरून सिव्हील रुग्णालयात आणला. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत पोलिसांना माहिती देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांना डॉक्टरांनी माहिती दिल्याचं कळताच प्रिया आणि महेश तिथून पलायन केले.

कासारवडवली पोलिसांना मृतदेहाची पाहणी केली असता गोपाळच्या शरीरावरील जखमा अपघाताच्या नसल्याचे लक्षात आले. तसेत शवविच्छेदन केल्यानंतर गळा आवळल्याने आणि झोपेच्या गोळ्यांच्या अतिसेवनातून आणि डोक्यावर प्रहार केल्याने गोपाळचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. गोपाळचा मृतदेह सिव्हील रुग्णालयात सोडून प्रिया व महेश माथेरानला पळून गेले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित गोपाळची पत्नी प्रिया आणि तिचा प्रियकर महेश कराळे यांना नेरळ येथून अटक केली. पोलिसांनी आरोपींची उलट तपासणी केली असता त्यांनी गोपाळच्या हत्येची कबुली दिली.

 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकMatheranमाथेरानhospitalहॉस्पिटल