शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

Video : लज्जास्पद! पोलिसांनी ब्लाऊज पकडले, खासदारांसह इतरांवर लाठीचार्ज करून धक्काबुक्की

By पूनम अपराज | Updated: October 2, 2020 18:14 IST

Hathras Gangrape : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की करून अटक केल्याची घटना ताजी असतानाच आता तृणमूलच्या खासदारांना देखील धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देहाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांना सांत्वन करण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन, ममता ठाकुर यांच्यासह इतर नेते गावात पोहोचले होते.

उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशपोलिसांनी धक्काबुक्की करून अटक केल्याची घटना ताजी असतानाच आता तृणमूलच्या खासदारांना देखील धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे.हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांना सांत्वन करण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन, ममता ठाकुर यांच्यासह इतर नेते गावात पोहोचले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना गावाच्या सीमेवर रोखले. यावेळी पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली. त्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी खासदार डेरेक ओ ब्रायन यांना धक्काबुक्की करून बाहेर काढले. दरम्यान, डेरेक ब्रायन हे जमिनीवर खाली कोसळले. तर महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी अमानुषपणे बाहेर ढकलले. तृणमूल काँग्रेसच्या नेता ममता ठाकुर यांनी सांगितले की, 'उत्तर प्रदेश महिला पोलिसांनी आमच्यासोबत धक्काबुक्की केली. त्यावेळी त्यांनी आमचे ब्लाउज पकडले, आमच्या खासदारांवर लाठीचार्ज केला आणि जमिनीवर पाडले. पुरूष पोलिसांनी सुद्धा गैरवर्तणूकीने वागले, हा अत्यंत लज्जास्पद प्रकार होता'कालच पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरस येथे जात असताना यमुना एक्स्प्रेस वेवर प्रियंका आणि राहुल गांधींना पोलिसांनी अडवलं. दरम्यान त्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. या प्रकरणात आता राहुल गांधींसह 200 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा. दं. वि. कलम १४४ म्हणजेच जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांविरोधात कलम 188, 269, 270 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारtmcठाणे महापालिकाPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश