शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Video - 32 मिनिटांत 20 कोटींचा दरोडा; रिलायन्स ज्वेलरी शोरूममध्ये धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 09:06 IST

अवघ्या 32 मिनिटांत दरोडेखोरांनी रिलायन्स ज्वेलरी शोरूम फोडून 20 कोटींचे दागिन्यांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये अवघ्या 32 मिनिटांत दरोडेखोरांनी रिलायन्स ज्वेलरी शोरूम फोडून 20 कोटींचे दागिन्यांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शोरूममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घाबरवण्यासाठी चोरांनी काहींना बंदुकीचा धाक दाखवला आणि काहींना बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चार जण शोरूममध्ये घुसले आणि त्यांचे काही साथीदार बाहेर उभे होते. राजपूर रोडवर असलेल्या रिलायन्स ज्वेलरी शोरूममध्ये दरोड्याची ही घटना घडली. शोरूम सकाळी 10.15 वाजता उघडलं होतं. शोरूमचे 11 कर्मचारी ग्राहक येण्यापूर्वीच दागिन्यांची व्यवस्था करत होते. डिस्प्ले बोर्डमध्ये 20 कोटींहून अधिक किमतीचे हिरे आणि सोन्याचे दागिने होते. 

सकाळी 10.24 वाजता मास्क घातलेले चार जण शोरूममध्ये घुसले. त्यांनी आधी सुरक्षा रक्षक हयात सिंहला आत ओढले. यानंतर शोरूममधील संपूर्ण कर्मचार्‍यांना बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवून सर्वांचे मोबाईल जप्त करण्यात आले. काही कर्मचाऱ्यांनी विरोध केला असता हल्लेखोरांनी त्यांना मारहाण केली. दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांचे हात प्लास्टिकच्या बँडने बांधले आणि शोरूमच्या पॅन्ट्री रूममध्ये सर्वांना कोंडलं. 

काही महिला कर्मचाऱ्यांना धमकावून डिस्प्ले बोर्डवर लावलेले दागिने काढून बॅगमध्ये टाकण्यास भाग पाडले. यानंतर त्यांनी तीन महिला कर्मचाऱ्यांना किचनमध्ये कोंडलं. दरोडेखोरांनी अर्धा तास शोरूममध्ये लूटमार सुरू ठेवली होती पण कोणालाही याची कल्पना आली नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हाच आसपासच्या लोकांना दरोड्याची घटना घडल्याचं समजलं. मात्र दरोडेखोर पळून जात असताना जवळच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते कैद झाले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी