शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video : एटीएम लुटायला गेले अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 17:00 IST

हे एटीएम लुटण्यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिघे चोरटे आले होते. या तिघांनि बंदुकीचा धाक दाखवून एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न फसला होता. या तिघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. 

ठळक मुद्दे एटीएम लुटण्यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिघे चोरटे आले होतेया तिघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली आहेया आरोपींकडून दोन रिव्हॉल्वर आणि एक अॅक्टीव्हा गाडीही पोलिसांनी हस्तगत केली

मुंबई - कांदिवली परिसरात लोखंडवाला परिसरात विजया बँकेचे एटीएम आहे. हे एटीएम लुटण्यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिघे चोरटे आले होते. या तिघांनी बंदुकीचा धाक दाखवून एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न फसला होता. या तिघांना कांदिवलीतील समता नगर पोलिसांनी अटक केली आहे. 

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस तीन दिवस बँकांना सलग सुट्ट्या होत्या.  त्यामुळे एटीएममध्ये रोख रक्कम जास्त असण्याचा चोरट्यांचा अंदाज होता. मात्र, हा अंदाज पुरता फसला आहे. दोन दिवसांपासून हे आरोपी थांबले होते आणि एटीएमवर पाळत ठेवून होते. मात्र बंदुकीचा धाक दाखवून एटीएम लुटीच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक करण्यात आली. या तिघांपैकी एकाला उत्तर प्रदेशातून पकडण्यात आले. तर दोघांना सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने जेरबंद करण्यात आले आहे. अटक केलेल्या तीन चोरट्यांनी नावं अँथोनी मनेजेस, शिवम मिश्रा आणि मोहम्मद मोजीम अशी आहेत. या आरोपींकडून दोन रिव्हॉल्वर आणि एक अॅक्टीव्हा गाडीही पोलिसांनी हस्तगत केली. ही अॅक्टीव्हाही चोरीची असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyदरोडाArrestअटकbankबँक