शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Video: फिल्मी स्टाईल पाठलाग करून ७ जणांनी एकाची केली हत्या; CCTV पाहून अंगावर काटा येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 18:16 IST

चेनप्पाच्या हत्येनंतर आरोपी तिथून पसार झाले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने तपास सुरू केला.

कोप्पल - एका बेकरीचं दुकान रोजसारखं शांत होते, परंतु ३१ मे रोजी संध्याकाळी त्या जागी अचानक क्रूर हत्याकांड घडले त्यामुळे सगळेच हादरले. कोप्पल जिल्ह्यातील एका व्यक्तीचा सात जणांनी मिळून चाकू आणि दांडक्याने खून केला. ही पूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली जी पाहून बघणाऱ्याच्या अंगावर काटा आला.

या हत्येतील मृतकाचे नाव चेनप्पा नरिनाल असं आहे. व्हिडिओत स्पष्टपणे चेनप्पा स्वत:चा जीव वाचवण्यासाठी बेकरीत शिरताना दिसतात, परंतु हल्लेखोर त्याच्यामागोमाग तिथे दाखल होतात. एक गुंड चेनप्पा यांच्या डोक्यात दांडक्याने वार करतो तर इतर दोघे त्यांच्यावर चाकूने हल्ला सुरू करतात. चेनप्पाची अवस्था इतकी खराब होती की त्यांच्या शरीरावर प्रत्येक ठिकाणी जखमा आणि रक्त वाहत होते. चेनप्पा जीव वाचवण्यासाठी धडपडत होते परंतु हल्लेखोरांनी त्यांना सोडले नाही. चेनप्पा कसे बसे बेकरीतून बाहेर पडले तरीही हल्लेखोरांनी पाठलाग करत त्यांच्यावर चाकू हल्ला केला.

चेनप्पाच्या हत्येनंतर आरोपी तिथून पसार झाले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने तपास सुरू केला. या घटनेतील ७ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. या आरोपींमध्ये रवी, प्रदीप, मंजूनाथ, नागराज, गौतम आणि प्रमोद यांचा समावेश होता. या हत्येमागे जुना वाद आणि मालमत्तेचे कारण असल्याचे समोर आले आहे. सध्या पोलीस या घटनेतील इतर आरोपींचा शोध घेत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. या घटनेतील आरोपींविरोधात कठोर पुरावे शोधण्याचं काम पोलीस करत आहेत. 

नेमकं काय घडलं?

३१ मे रोजी रात्री १० च्या सुमारास ७ जण तलवार, चाकू आणि दांडके घेऊन एका बेकरी शॉपमध्ये घुसतात. तिथे एका व्यक्तीवर हल्ला करतात. या हल्ल्यात चेनप्पा यांच्या गळ्यावर, पाठीवर, डोक्यासह शरीरावर वार करतात. त्यात घटनास्थळी त्यांचा मृत्यू होतो. चेनप्पाच्या मृत्यूनंतर हल्लेखोर तिथून पसार होतात. ज्याठिकाणी ही घटना घडली तिथूनच १ किमी अंतरावर पोलीस स्टेशन आहे. चेनप्पा हा मोलमजुरी करणारा होता. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली. काही जण त्यांच्या फोनमधून व्हिडिओ काढत होते. पोलिसांनी या घटनेतील सर्व आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी