शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार झालेल्या पीडितेला भर चौकात उभे करून पोलिसांनी नोंदविली साक्ष; वर्ध्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 23:11 IST

झडशी येथील विनयभंग प्रकरण; पोलिसांकडूनच पीडितेची ओळख उघड

वर्धा : विनयभंग, बलात्कार आदी गंभीर गुन्ह्यातील पीडितेची ओळख उघड होईल तसेच तिची समाजात बदनामी होईल असे कृत्य कुणीही करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु, न्यायालयाच्या निर्देशांकडे खुद्द महिला पोलिसांनीच पाठ दाखविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सेलू तालुक्यातील झडशी गावात उघडकीस आला आहे. विनयभंग प्रकरणाच्या तपासासाठी आलेल्या महिला पोलिसांनी पीडितेला भर चौकात उभे ठेवत तिच्या समक्ष काही व्यक्तींची साक्ष नोंदविली. या घटनेमुळे झडशी परिसरात खळबळ उडाली आहे.

झडशी नजीकच्या एका गावातील अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना एका मुलाने तिला वाटेत अडवून तिचा विनयभंग केला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने 'तू माझ्यावर प्रेम कर, नाहीतर मी माझ्या हातावर चिरेमारेल' अशी धमकी दिली. या प्रकरणी सेलू पोलिसात विनयभंगाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणातील आरोपी जामिनावर सुटून आला आहे.

शुक्रवारी याच गुन्ह्याच्या तपासासाठी मुख्यालय असलेल्या वर्धा येथून दोन महिला अधिकारी झडशी येथे पोहोचल्या. त्यांनी पीडितेची बदनामी होईल असे कृत्य करीत तिला रस्त्यावर उभे ठेवून तिचे व काही साक्षदारांची साक्ष नोंदविली. यावेळी या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत एक पुरुष कर्मचारी उपस्थित होता. पीडित मुलगी व तिची आई पोलिसांच्या गाडीमागे धावत असल्याचे विदारक चित्र येथे दिसून आले. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे नागपंचमी निमित्त येथील प्राचिन नागमंदीरात दर्शनासाठी येणाऱ्यांची मोठी गर्दी या सर्व व्यक्तींनी उघड्या डोळयांनी हा गंभीर प्रकार पाहिला.

आज काही कर्मचारी पंचनामा व बयाण नोंदविण्यासाठी झडशी येथे गेले होते. जर असा प्रकार घडला असेल तर ते नक्कीच चुकीचे आहे. या प्रकाराबाबतची चौकशी करण्यात येईल. - पियुष जगताप,

टॅग्स :Policeपोलिसsexual harassmentलैंगिक छळ