शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वेरॉन समूहावर छापे, १२ कोटीची मालमत्ता जप्त; मुंबई, नागपूर, पुण्यात ED ची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 06:39 IST

या प्रकरणी कंपनी व प्रवर्तकांविरोधात सीबीआयने तीन गुन्हे दाखल केले होते. मात्र, यातील आर्थिक व्यवहारांची मर्यादा पाहता गेल्या वर्षी मे महिन्यात ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

मुंबई : बँकांकडून कर्ज घेत तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी पुणेस्थित वेरॉन समूहाची पुणे, नागपूर, रत्नागिरी आणि गोवा येथील १२ कोटी ८० लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) मंगळवारी जप्त केली. कंपनीचा आतापर्यंतच्या जप्तीचा आकडा १७९ कोटी २७ लाख रुपयांवर पोहोचला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, कॅनरा बँकेसह आणखी काही बँकांकडून कंपनीच्या विस्तारासाठी कंपनीचे प्रवर्तक एस. पी. सवईकर (आता मृत झालेले) यांनी महाकाय कर्ज घेतले होते. कालांतराने हे कर्ज थकले; परंतु तरीही काही बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठ्या रकमेचे ‘लेटर ऑफ क्रेडिट’ मिळवले होते. या माध्यमातून कंपनीला जे पैसे मिळाले त्या पैशांचा वापर कंपनीने विस्तारासाठी न करता त्यातून काही प्रमाणात जुने कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला तर उर्वरित पैसे अन्य ठिकाणी फिरवत वैयक्तिक मालमत्तांची खरेदी केल्याचा ठपका कंपनीवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी कंपनी व प्रवर्तकांविरोधात सीबीआयने तीन गुन्हे दाखल केले होते. मात्र, यातील आर्थिक व्यवहारांची मर्यादा पाहता गेल्या वर्षी मे महिन्यात ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

सुरुवातीला १६६  कोटींची मालमत्ता जप्त प्राथमिक तपासादरम्यानच कंपनीने मनी लाँड्रिंग केल्याचे दिसून आल्यावर ईडीने १६६ कोटी ४७ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे, तर त्यानंतर अधिक माहिती प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी ईडीने कंपनीची आणखी १२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. या जप्तीच्या कारवाईमध्ये नागपूर, पुणे, रत्नागिरी आणि गोवा येथील भूखंडांचा समावेश आहे.