शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

प्रेम, लिव्ह इन, धोका! प्रेयसीसह केली तिच्या आईची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 9:43 PM

प्राथमिक तपासात मुलीचा लिव्ह इनमध्ये असलेल्या मुलाने पहाटे मृत कुटुंबियांच्या कारमधून पळ काढला होता असल्याचे उघड झाले.

ठळक मुद्देपोलिसांनी आई-मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. आत जाऊन पाहिले तर तिने घरात सुमिता आणि समरिता रक्ताच्या थारोळ्यात असलेले पाहिले.दक्षिण दिल्लीतील गढ़ी गावात राहणारा विक्रांत उर्फ विनय नागर यांचा सुमिता यांची मुलगी समरिता हिच्याशी प्रेमसंबंध होते.

नवी दिल्ली - सकाळी पहाटे चारच्या सुमारास मनसारा अपार्टमेंटच्या आतून एक कार वेगाने बाहेर आली. बंद गेटला धडक दिल्याने सुरक्षारक्षक खडबडून जागा झाला.  गाडीच्या आत बसलेल्या व्यक्तीला पहारेकरी ओळखत होते. मुलाने सॉरी म्हटल्यावर सुरक्षारक्षकाने गेट उघडला आणि बॅरिकेड काढून गाडी सोडली. कारमध्ये चालकाव्यतिरिक्त आणखी एक तरुणही बसला होता. सकाळी आठच्या सुमारास नोकराने दरवाजा उघडून मोठमोठ्याने आरडाओरडा केला, तेव्हा दुहेरी हत्या प्रकरण उघडकीस आले आणि या घटनेने अपार्टमेंटमधील रहिवासी हैराण झाले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात मुलीचा लिव्ह इनमध्ये असलेल्या मुलाने पहाटे मृत कुटुंबियांच्या कारमधून पळ काढला होता असल्याचे उघड झाले.लिव्ह इनमध्ये राहत होते, मात्र नात्यात कटुता आली होतीपोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील गढ़ी गावात राहणारा विक्रांत उर्फ विनय नागर यांचा सुमिता यांची मुलगी समरिता हिच्याशी प्रेमसंबंध होते. दोघेही जवळजवळ चार वर्षे लिव्ह इनमध्ये राहत होते. त्यामुळे विक्रांत बहुतेक वेळा त्याच्या घरी रहायचा. पण सुमारे तीन ते चार महिन्यांपासून दोघांमध्ये भांडण सुरू होते. नात्यातील कटुता इतकी वाढली होती की हे प्रकरण ब्रेकअपपर्यंत पोचले होते. सुरुवातीच्या चौकशीत असे उघडकीस आले आहे की, विक्रांत आई-मुलीच्या पैशांवर मौजमजे करीत असे. तो बर्‍याचदा सुमिता यांची गाडी वापरत असे.

 

घरकाम करणाऱ्या बाईने पहिले रक्ताने माखलेले मृतदेहपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमिता आणि तिची मुलगी समरिता काही वर्षे वसुंधरा एन्क्लेव्हमधील मनसारा अपार्टमेंटच्या तिसर्‍या मजल्यावर राहत होती. मूळचे केरळमधील असलेल्या सुमिताच्या पतीचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. ती नोएडा -142 स्वयंसेवी संस्थेत उच्च पदावर कार्यरत होती. त्यांच्या मुलीने शिक्षण घेतल्यानंतर हॉस्पिटॅलिटीचे प्रशिक्षण घेत होती. मागील काही काळापासून, समरिता त्याच्या मित्रासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. तो मित्र तिच्या घरी येत - जात असे. आई व मुलगी दररोज सकाळी आपआपल्या कारने घर सोडत. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास सुमिताच्या घरी काम करणारी मोलकरीण घरी पोचली आणि दार उघडे पाहिले. आत जाऊन पाहिले तर तिने घरात सुमिता आणि समरिता रक्ताच्या थारोळ्यात असलेले पाहिले.आरोपीला अटकमोलकरणीने आरडाओरडा केल्यानंतर शेजार्‍यांनी घराकडे धाव घेतली, नंतर त्यांनी पोलिसांना बोलावले. तपासादरम्यान पोलिसांना कळले की, ते दोघे शुक्रवारी शेवटच्या वेळेस आपापल्या कार्यालयात गेले होते. पोलिसांना घरातील सर्व वस्तू विखुरलेल्या आढळल्या. घरात दागिने आणि रोख रक्कम गहाळ होण्याची शक्यता वर्तवली. पोलीस हत्येबाबत सध्या काहीही बोलण्यास तयार नाही. घरात कोणताही पुरावा सापडला नसल्याचा पोलिसांचा दावा आहे. घराच्या मैत्रीपूर्ण संबंध असल्याने पहाटे तडकाफडकी लिव्ह इनमध्ये असलेला मित्र घरातून पळ काढल्याने पोलिसांची संशयाची सुई त्याच्याकडे होती. पोलिसांनी आई-मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. यावेळी पोलिसांची अनेक पथके तयार करून आरोपींचा शोध घेतला असता त्यांना आरोपीला अटक केली.

दागिने आणि रोख रक्कम देखील गायब तपासादरम्यान घरात दागिने आणि रोकडही गायब असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांना घराच्या सभोवतालचे सर्व सामान विखुरलेले आढळले ज्यावरून असे दिसते की, आरोपींनी संपूर्ण घर साफ केले. हत्येसाठी धारदार शस्त्रे वापरण्यात आला आहे. दोघींच्या शरीरावर अनेक वेळा वार करण्यात आले आहे. सकाळी विक्रांतने गेटला धडक दिली तेव्हा तोसुद्धा सुरक्षारक्षकाला सॉरी बोलून निघून गेला. अपार्टमेंटमध्ये नेहमी येणे - जाणे असल्याने सुरक्षारक्षकाने संशय घेतला नाही. अपार्टमेंटमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपी कॅमेऱ्यामध्ये प्रवेश करून गेटच्या समोर कारमधून बाहेर पडताना दिसत आहेत. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकdelhiदिल्ली