शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत एकाचा गळा आवळून खून; दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 19:27 IST

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.  

ठळक मुद्देचार जून रोजी घडला होता प्रकारमयत हिंगोली जिल्ह्यातील

परभणी/हिंगोली : मटण आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील रांजोना गावातील तीन व्यक्ती परभणी जिल्ह्यात आल्यानंतर त्यांच्यात दारू पिल्यानंतर वाद झाला. या वादातून दोघांनी एकाचा गळा आवळून खून केल्याची घटना ४ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास सिंगणापूर शिवारात घडली. 

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.  मारोती डिगंबर साळवे (३४) हा हयातनगर येथे मटन आणण्यासाठी म्हणून ४ जून रोजी दुपारी ३ वाजता घरून गेला होता. परतला नाही म्हणून त्याचा शोध घेतला. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास हट्टा पोलीस ठाण्यात मारोती साळवे हे हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर हट्टा पोलिसांनी या प्रकरणाचा शोध सुरु केला. पोलिसांना मारोती  साळवे हा त्याच्याच गावातील गजानन साळवे व देविदास साळवे यांच्या सोबत दारु पिताना दिसला होता, असे समजले. वेगवेगळी पथके नेमून या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना चौकशी दरम्यान वेगळीच माहिती समोर आली. त्यामध्ये या दोघांनी मारोती साळवे याला मटण आणण्यासाठी परभणी येथे दुचाकीवर आणले.

परभणीत त्यांनी दारु घेतली. त्यानंतर पंढरपूरला सोबत जाऊ म्हणून गंगाखेडकडे जाताना सिंगणापूर शिवारात असलेल्या गंगाखेड रस्त्यावरील कॅनॉलवर तिघांनी दारु पिली. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. या वादात आरोपी गजानन साळवे व देविदास साळवे यांनी ४ जून रोजीच सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मारोती साळवे याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचे प्रेत, मोबाईल व चपला कॅनॉलच्या पाण्यात टाकल्या.  हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे व त्यांच्या पथकाने आरोपींच्या नातेवाईकांसह संबंधित घटनास्थळी जाऊन पाहणी केली व  ताडकळस पोलिसांना एक प्रेत मिळाल्याची माहिती मिळाली. मयताच्या नातेवाईकांनी सदर प्रेत हे मारोती साळवे याचेच असल्याचे ओळखले. 

१३ जूनपर्यंत पोलीस कोठडीमयत मारोती साळवे यांचे नातेवाईक मारोतीराव जोगदंड यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपीविरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हट्टा पोलिसांनी या आरोपींना ताडकळस पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई हिंगोलीचे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हट्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, पोलीस नाईक नय्यर शेख, इम्रान कादरी, प्रवीण चव्हाण, होमगार्ड पाईकराव, आठवले यांच्या पथकाने पार पाडली. दरम्यान, या प्रकरणातील दोन्ही आरोपींना परभणी येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीHingoliहिंगोलीMurderखून