शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पोलिसानं तपासणीदरम्यान तरुणाच्या कपाळावर ठोकली चावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 17:55 IST

पोलिसांच्या अमानवी कृतीविरोधात संतापाची लाट; पोलीस ठाण्यावर दगडफेक

उत्तराखंडच्या उधम सिंह नगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी एका व्यक्तीच्या डोक्यात चावी ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे. रुद्रपूरमधल्या सिटी पेट्रोल युनिटनं (सीपीयू) एका तरुणाच्या कपाळावर चावी ठोकली. हा अमानवीय प्रकार पाहून अनेकांना संताप अनावर झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली.सिटी पेट्रोल युनिटला पोलीस मित्र म्हणून ओळखलं जातं. मात्र पोलीस मित्रांच्या कृत्यामुळे सध्या त्यांच्याविरोधात संतापाची लाट पसरली आहे. सीपीयूमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांनी रुद्रपूरमधल्या रम्पुरा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या दुचाकीची चावी तपासणी दरम्यान काढून घेतली. यानंतर पोलिसांनी ती चावी त्याच्याच कपाळावर ठोकली. यामुळे एकच गोंधळ झाला. त्यानंतर स्थानिक आमदार राजकुमार ठुकराल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सीपीयूला रुद्रपूरमधून हटवण्याची मागणी केली. पोलिसांचा अमानवीपणा दाखवणारा प्रकार घडल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. त्यानंतर पोलीस ठाण्यावर दगडफेक झाली. या घटनेची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पोलिसांकडून सर्वसामान्यांना अशा प्रकारची वागणूक मिळत असेल तर मग त्यांना मित्र का म्हणायचं, असा सवाल उपस्थित केला जात आहे.