शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Bulli Bai App: 'Bulli Bai' प्रकरणाची मास्टरमाईंड निघाली उत्तराखंडमधील महिला!, मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 17:06 IST

Bulli Bai App Case: 'बुल्ली बाई अ‍ॅप' प्रकरणी मुंबई पोलिसांनी बंगळुरूतून एका २१ वर्षीय इंजिनिअरिंगच्या शिक्षण घेणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.

Bulli Bai App Case: 'बुल्ली बाई अ‍ॅप' प्रकरणी मुंबई पोलिसांनी बंगळुरूतून एका २१ वर्षीय इंजिनिअरिंगच्या शिक्षण घेणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव विशाल कुमार (२१) असं असून त्याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुल्ली बाई अ‍ॅप प्रकरणामागची मुख्य आरोपी आणि मास्टरमाईंड उत्तराखंडमध्ये राहणारी एक महिला आहे. या महिलेला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोघंही एकमेकांना ओळखत होते. फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दोघांची एकमेकांशी ओळख झाली होती. 

पोलिसांनी याप्रकरणात आणखी एका आरोपीला देखील ताब्यात घेतलं आहे आणि चौकशी सुरू आहे. २१ वर्षीय विशाल कुमार याला बंगळुरूतून अटक केल्यानंतर त्याला चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आलं आहे. 

असा झाला खुलासा...१ जानेवारी रोजी जेव्हा अनेक मुस्लिम महिलांनी त्यांचा फोटो बुल्ली अ‍ॅपवर अपलोड झालेला पाहिल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. GitHub प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होस्ट करण्यात आलेल्या अ‍ॅपमध्ये मुस्लिम महिलांचे फोटो वापरले जात होते आणि त्यांची बोली लावली जात असल्याचा प्रकार सुरू होता. विशेषत: यात मुस्लिम महिलांना लक्ष्य केलं जात होतं. ज्या महिला सामाजिक, राजकीय क्षेत्रात अग्रेसर असतात अशा महिलांना लक्ष्य करुन त्यांच्यावर बोली लावण्याचा प्रकार बुल्ली बाई अ‍ॅपवर सुरू होता. यात महिला पत्रकार, कायकर्ता आणि वकील यांना लक्ष्य केलं जात होतं. याआधी सुल्ली डील्स नावाचं अ‍ॅप देखील सुरू होतं. बुल्ली अ‍ॅप हे त्याच अ‍ॅपचं दुसरं रूप होतं. 

शीख समुदायाशी प्रकरण जोडण्याचा प्रयत्नमुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विशाल कुमार यानं जाणूनबुजून 'खालसा सुपरमेसिस्ट' नावानं अकाऊंट सुरू केलं होतं. ३१ डिसेंब रोजी त्यानं अकाऊंटचं नाव शीख समुदायाशी संबंधित असं ठेवलं. पण या अ‍ॅपचा शीख समुदायाशी कोणताही संबंध नाही. पण आरोपीनं समाजात तेढ निर्माण करण्यासाठी जाणूनबुजून असं भासवण्याचा प्रयत्न केला होता. 

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसCrime Newsगुन्हेगारी