शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेडमधून अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी सापडली उत्तर प्रदेशात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 18:01 IST

शहरातून अपहरण झालेल्या सोळा वर्षीय मुलीस अपहरणकर्त्यासह उत्तर प्रदेशातुन ताब्यात घेण्यात आले आहे.

गंगाखेड (परभणी ) : शहरातून अपहरण झालेल्या सोळा वर्षीय मुलीस अपहरणकर्त्यासह उत्तर प्रदेशातुन ताब्यात घेण्यात आले. दरम्यान अपहरणकर्त्यास न्यायालयाने बुधवार (दि. १८) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहरातील सोळा वर्षीय मुलीचे दि. २ जुलै २०१८ रोजी पहाटेच्या सुमारास तिच्या राहत्या घरून अपहरण झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच दिवशी संध्याकाळी अज्ञात अपहरणकर्त्या विरूद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच दरम्यान अपहत सोळा वर्षीय मुलगी जळगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर रेड्डी, पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि भाऊसाहेब मगरे, पो.ना. निलेश जाधव, जमादार साहेब मानेबोईनवाड, मपोशि मनिषा केंद्रे, मपोशि मिरा पवार यांच्या पथकाने जळगाव येथे अपहत मुलीचा शोध घेतला मात्र ती मिळुन आली नाही. 

यानंतर पोलिसांना अपहारणकर्त्याने मुलीस उत्तर प्रदेशात नेल्याची माहिती मिळाली. तेंव्हा पोलीस अधिक्षक दिलीप झळके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेश राज्यातील संत कबीर जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक यांच्याशी संपर्क साधण्यात आला. माहोली पोलीस ठाण्यातील स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या सहकार्याने पोउपनि भाऊसाहेब मगरे व त्यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.१३ ) कुडिया या गावातुन अपहत मुलीस ताब्यात घेतले. तसेच तिला फूस लावून पळवुन नेणाऱ्या यशवंत रामरूप चौधरी (२४, रा. कुडिया) यास ताब्यात घेण्यात आले. 

आरोपी चौधरी यास पोलिसांनी रविवारी (दि. १५) गंगाखेड पोलीस ठाण्यात आणले. मुलीची वैद्यकीय तपासणी करून अपहरणाच्या गुन्ह्यात ३७६ बाल लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण कायदा कलम ३, ४, ७, ८, ११, १२  चे कलम वाढवुन आरोपी चौधरी यास अप्पर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास बुधवार (दि. १८) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पो.नि. सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि भाऊसाहेब मगरे, पोना निलेश जाधव हे करत आहेत.

टॅग्स :KidnappingअपहरणparabhaniपरभणीUttar Pradeshउत्तर प्रदेशParbhani policeपरभणी पोलीस