शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Uthra murder case: कोब्रा अंगावर सोडून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 17:10 IST

कोर्टाने आरोपीच्या वयाकडे बघून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देत नसल्याचे म्हटले आहे. मात्र, कोर्टाने ही हत्या अत्यंत थंड डोक्याने आणि हेतुपुरस्सर केली असून माणुसकीला काळीमा फासणारी घटना असल्याचा ठपका ठेवला आहे.

अंगावर विषारी क्रोबा सोडत पत्नीची निर्घुण हत्या करणाऱ्या केरळमधील दोषी पतीला कोर्टाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही अत्यंत दुर्मिळ घटना असल्याचे सांगत कोर्टाने आरोपीच्या वयाकडे बघून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देत नसल्याचे म्हटले आहे. मात्र, कोर्टाने ही हत्या अत्यंत थंड डोक्याने आणि हेतुपुरस्सर केली असून माणुसकीला काळीमा फासणारी घटना असल्याचा ठपका ठेवला आहे.

३२ वर्षीय आरोपी पती सुरजने हुंड्यासाठी २५ वर्षीय पत्नी उत्तराचा छळ करत हत्या केली. या प्रकरणी कोर्टाने आता पत्नीच्या हत्येसाठी कोब्रा नागाचा उपयोग करणे, विष देणे, पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करणे आणि हत्या असे गुन्हे आरोपीवर ठेवले आहेत. यापैकी विष देण्याच्या गुन्ह्यासाठी १० वर्षं आणि पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ७ वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे. ही शिक्षा भोगून झाल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा सुरू होणार आहे.

काय आहे प्रकरण?७ मे २०२० रोजी उथरा घरामध्ये झोपलेली असताना तिला कोब्रा चावला. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. यानंतर उथराच्या माहेरच्या मंडळींनी तिचा पती सूरजवर तिच्या हत्येचा आरोप केला होता. सूरजने पत्नीच्या खोलीत मुद्दाम कोब्रा सोडला होता, जेणेकरुन तो चावल्यामुळे तिचा मृत्यू होईल. तपासामध्ये सूरजने दोन वेळा साप पकडणाऱ्याला पैसे देऊन साप खरेदी केल्याचं समोर आलं आहे. त्याने याआधीही सर्पदंशाने पत्नी उथराचा काटा काढण्याचा मोठा कट रचला होता. मात्र त्यामध्ये तो यशस्वी झाला नाही अशी माहिती समोर आली आहे. 

हुंड्यासाठी पत्नीचा छळ करायचासूरजला लग्नामध्ये भरपूर हुंडा देण्यात आला होता. यामध्ये रोख रक्कम, नवीन कार आणि सोन्याचे दागिने यासह अनेक मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. मात्र तरी देखील तो समाधानी नव्हता. तो सतत पैसे मागत असे. हुंड्यासाठी पत्नीचा छळ करायचा असा आरोप उथराच्या कुटुंबीयांनी केला होता. उथराच्या मृत्यूवरुन तिच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या संशयाच्या आधारे सूरजला अटक करण्यात आली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKeralaकेरळdowryहुंडा