शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ई-सिम वापरताय? धोक्याचे आहे; भामट्यांपासून सावध रहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 06:13 IST

सायबर विभागाचा इशारा : तपशिलाची चोरी होत असल्याचे उघड

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बाजारात सध्या ई-सिम म्हणजेच एम्बेडेड सिम असलेले स्मार्टफोन बाजारात आले आहेत. मात्र सायबर भामट्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत यातही मोबाइल ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सायबर विभागाने सावधगिरीचा इशारा दिला आहे. 

या नव्या स्मार्टफोनमध्ये वेगळ्या सिमकार्डची आवश्यकता नसते. तुम्ही फक्त ई-सिम अ‍ॅक्टिव्हेट करून, योग्य शुल्क भरून हवे ते नेटवर्क निवडून हा फोन वापरू शकता. एअरटेलने नुकतेच असे सिम जारी केले. मात्र त्यानंतर काही काळातच फसवणुकीच्या तक्रारी येऊ लागल्या आणि सायबर भामटे कसे काम करत आहेत, ते समोर आले.सायबर भामटे #१२१ या एअरटेलच्या नंबरवर स्वत:चा ई-मेल आयडी ग्राहकांच्या नावाने अपडेट करतात. ग्राहकाच्या नावाने ई-सिमकार्ड जारी करून घेतात. तसेच क्यूआर कोडचा वापर करून ते ई-सिम सुरू करून घेतात. त्यानंतर त्या ग्राहकाला एक संदेश येतो, त्यात लिंकवर क्लिक केल्यास एक फॉर्म उघडतो.

त्यात तुमची सर्व आर्थिक माहिती जसे की बँक खात्याचा नंबर क्रेडिट/डेबिट कार्ड नंबर, पिन नंबर सर्व विचारले जातात. सायबर भामटे त्यांच्या फोनमधील तुमच्या नावाचे ई-सिम वापरून तुमची सर्व बँक खात्यातील रक्कम ट्रान्सफर करून तुमची फसवणूक करतात. त्यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे.बनावट आरोग्य सेतू अ‍ॅप 

भारतीयांचा डाटा चोरण्यासाठी पाकिस्तानी हॅकर्सनी बनावट आरोग्य सेतू अ‍ॅपही बनविले आहे. त्यातून हे अ‍ॅप वापरणाऱ्यांची माहिती चोरण्याचा प्रयत्न होतो आहे.काय करा आणि करू नका... गरज नसल्यास हे ई-सिम अ‍ॅक्टिव्हेट करू नका.  कोणताही ई-मेल आयडी, तुमचा ई-मेल आयडी म्हणून देऊ नका.सोशल मीडियावर तुमचा मोबाइल क्रमांक शेअर करू नका.ई-सिमबाबत फोन आल्यास संबंधित कंपनीच्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधून खातरजमा करून घ्या.इंटरनेटवरील कोणत्याही फॉर्मवर तुमच्या बँक खात्याची माहिती डेबिट/क्रेडिट कार्ड नंबर, पिन नंबर देऊ नका.  

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम