शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

क्विंटलला १५ रुपये नफ्यासाठी विकले वापरलेले हातमोजे, सुपरवायझरला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 1:25 AM

नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी देशभरात जुने हातमोजे विक्री करणारे रॅकेट उघडकीस आणले आहे.

नवी मुंबई : वापरलेले हातमोजे विक्रीप्रकरणी पोलिसांनी सहाव्या व्यक्तीला शनिवारी अटक करण्यात आली आहे. तो केरळच्या अमृता हॉस्पिटलमधील बायो वेस्ट मॅनेजमेंटचा सुपरवायझर आहे. क्विंटलमागे १५ रुपये नफ्यासाठी तो हॉस्पिटलमध्ये वापरलेले हातमोजे साठवून विक्री करत होता.नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी देशभरात जुने हातमोजे विक्री करणारे रॅकेट उघडकीस आणले आहे. यामध्ये आजतागायत पाच जणांना अटक झाली असून, त्यांच्याकडून ४८ टन जुने हातमोजे जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. यानुसार, शनिवारी धीरज हृषिकेशनला कोचीनच्या एर्नाकुलम भागातून अटक करण्यात आली आहे. कोचीनमधल्या अमृता हॉस्पिटलचा बायो वेस्ट मॅनेजमेंटचा सुपरवायझर आहे. कोचीनमधल्या अमृता हॉस्पिटलच्या सर्व शाखांमधून निघणाऱ्या बायो वेस्टची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. रुग्णालयातून निघणाºया बायो वेस्टमधून तो हातमोजे वेगळे करून साठवायचा. त्यानंतर, मागणी करणाऱ्यांना हा माल महाराष्ट्रात ठिकठिकाणी पुरवला जात होता. त्यापैकी सर्वाधिक मोठा साठा औरंगाबाद येथील वाळूज एमआयडीसीमध्ये करण्यात आला होता. तिथून तो भिवंडी व नवी मुंबईत पुरवला गेला होता.तीनशे किलो हातमोजे जप्तकोरोनामुळे प्रत्येक कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय पथकाला हातमोजांची गरज भासू लागल्याने, जुने हातमोजे पुन्हा विक्री करण्याच्या रॅकेटमध्ये धीरज सहभागी झाला. एर्नाकुलम भागातून त्याने विक्रीसाठी साठवलेले ३०० किलो जुने हातमोजे जप्त करण्यात आले आहेत. त्याला प्रत्येक १०० किलोमागे १५ रुपये नफा मिळत होता, अशी कबुली दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात मोठ्या रकमेचा फायदा त्याने उचलला असल्याचीही शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी