शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औषध निर्मितीच्या कच्च्या मालाचा ड्रग्ज बनवण्याकरिता वापर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 09:15 IST

कंपनीच्या परिसरात चित्रीकरणास मज्जाव, पोलिसांचे सर्च ऑपरेशन

- पंकज पाटीललोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : नालासोपारा येथे १४०० कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज पकडल्याबद्दल मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अंबरनाथच्या खासगी नमाऊ केम कंपनीत गुरुवारी रात्री सर्च ऑपरेशन केले. ही कंपनी औषध निर्मितीकरिता १४ प्रकारचा कच्चा माल तयार करत असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करीत आहे. या केमिकल कंपनीतून एमडी ड्रग्स बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा केल्याचा संशय  आहे. मात्र, मुंबई पोलिसांच्या पथकाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

अंबरनाथच्या ज्या केमिकल कंपनीमध्ये पोलिसांनी कारवाई केली, ती कंपनी गेल्या४० वर्षांपासून औषध निर्मितीसाठी लागणारा  कच्चा माल तयार करण्याचे काम करीत आहे. 

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने नालासोपारा येथे मोठी कारवाई करत १४०० कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज हस्तगत केले. या प्रकरणातील मुख्य आरोपीला घेऊन मुंबई पोलिसांचे पथक गुरुवारी सायंकाळी अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत असलेल्या नमाऊ केम कंपनीत दाखल झाले होते. तब्बल चार तास या कंपनीत मुंबई पोलिसांच्या पथकांनी सर्च ऑपरेशन केले. कंपनीचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून आत कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. या कारवाईबाबत पथकाच्या प्रमुखांना विचारले असता त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. तसेच कंपनीच्या परिसरात चित्रीकरण करण्यास मज्जाव करण्यात आला. या कंपनीचे एमडी ड्रग्जसोबतचे नेमके कनेक्शन काय आहे हे पोलिसांच्या तपासात उघड होणार आहे. या कारवाईबाबत पोलिसांनी गोपनीयता बाळगली असली तरी ज्या पद्धतीने पोलिसांचा कंपनीच्या परिसरात तपास सुरू होता त्यावरून या कंपनीचे थेट कनेक्शन गुन्हेगारांसोबत असल्याची चर्चा होत आहे.

औषध निर्मितीसाठी लागणारा तब्बल १४ प्रकारचा कच्चा माल या ठिकाणी तयार केला जातो. प्युअर ग्रेट केमिकल तयार करण्यात या कंपनीचे राष्ट्रीय बाजारपेठेत चांगले नाव आहे.देशातील नामांकित औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना अंबरनाथच्या नमाऊ केम कंपनीतून कच्चा माल मोठ्या प्रमाणात पुरवण्यात येतो. आंतरराष्ट्रीय बाजारात या कंपनीचा माल निर्यात केला जातो. या कारवाईबाबत कंपनीच्या संचालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ