शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तरूणीच्या बॉयफ्रेंडला मारण्यासाठी व्यक्तीने केला प्लान, गिफ्ट म्हणून पाठवला बॉम्ब आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 09:30 IST

US Crime News : तरूणीच्या बॉयफ्रेंडने जसा बॉक्स उघडला बॉम्ब फुटला. या घटनेत बॉयफ्रेंड गंभीर जखमी झाला. आता याप्रकरणी व्यक्तीवरील आरोप सिद्ध झाला आहे.

US Crime News : ही घटना आहे प्रेमाच्या त्रिकोणाची. एका तरूणाने एका तरूणीच्या बॉयफ्रेंडला बॉम्बने उडवण्याचा प्लान केला होता. या तरूणाने घरीच बॉम्ब तयार केला, त्याची पॅकिंग केली. मग 7 तासांचा प्रवास करून तरूणीच्या बॉयफ्रेंडच्या घरी डिलिवरी देण्यासाठी गेला. तरूणीच्या बॉयफ्रेंडने जसा बॉक्स उघडला बॉम्ब फुटला. या घटनेत बॉयफ्रेंड गंभीर जखमी झाला. आता याप्रकरणी व्यक्तीवरील आरोप सिद्ध झाला आहे.

एसीबी न्यूजनुसार, दोषी व्यक्तीचं वय 32 वर्षे असून त्याचं नाव एलेक्झांडर मेकॉय आहे. तो अमेरिकेच्या ओहियोमध्ये राहतो. मॅकायचं एका मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. तरूणीला तो सोशल क्लबच्या माध्यमातून काही वर्षापासून ओळखत होता. पण तरूणीने मेकॉयला हे स्पष्ट केलं होतं की, ती दुसऱ्या तरूणावर  प्रेम करते. मग मेकॉयने तिच्या बॉयफ्रेंडला संपवण्याचा प्लान केला.

या घटनेची सुरूवात ऑक्टोबर 2020 मध्ये झाली होती. यूएस अटॉर्नी ऑफिसने सांगितलं की, मेकॉयने होममेड बॉम्ब तयार केला. त्यासाठी मेकॉय अनेक ठिकाणी फिरला आणि बॉम्ब तयार करण्याच्या वस्तू गोळा केल्या. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्याने एक वस्तू अनेक ठिकाणाहून खरेदी केली. पैसे कॅशमध्ये दिले.

त्याने घरीच बॉम्ब तयार केला आणि एका पांढऱ्या रंगाच्या गिफ्ट बॉक्समध्ये पॅक केला. 30 ऑक्टोबर 2020 ला तो सात तासांचा प्रवास करून मेरीलॅंडमधील कॅरोल काउंटीला पोहोचला. इथे तरूणीचा बॉयफ्रेंड राहत होता. त्यानंतर मेकॉयने गिफ्ट तरूणीच्या बॉयफ्रेंडच्या घराच्या बाहेर सकाळी ठेवलं.

गिफ्ट बॉक्स बॉयफ्रेंडचे आजोबा घरात घेऊन गेले. दिवसभर गिफ्ट बॉक्स किचनमध्ये होता. जेव्हा बॉयफ्रेंड सायंकाळी घरी आला तेव्हा त्याने गिफ्ट पाहिलं, त्यावर त्याचं नाव लिहिलेलं होतं. गिफ्ट उघडण्याआधी त्याने गर्लफ्रेंडला मेसेज केला आणि तिला विचारलं की, हे गिफ्ट तिने पाठवलं आहे का? पण इतक्यात गिफ्ट बॉक्समधील बॉम्ब फुटला. घरात जोरदार धमाका झाला. यात तरूणीचा बॉयफ्रेंड गंभीर जखमी झाला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तो गंभीर जखमी असल्याने त्याचं ऑपरेशन करण्यात आलं. 

याप्रकरणी फेडरल एजन्सीने तपास सुरू केला. 10 मार्च 2021 मध्ये मेकॉयच्या घराची झडती घेतली. तिथे त्यांना बॉम्ब तयार करण्याच्या वस्तू आढळून आल्या. सुरूवातीला तर मेकॉयने हे त्याने केलं नसल्याचं सांगितलं. पण नंतर त्याने मान्य केलं की, हे कृत्य त्यानेच केलं.

मेकॉय शिक्षा अजून ठरलेली नाहीये. पण स्फोटक तयार करण्यासाठी आणि त्या वस्तू विकत घेण्यासाठी त्याला 20 वर्षांची शिक्षा मिळू शकते. तेच नॉन Register हत्यार आणि स्फोटकं ठेवण्यासाठी त्याला जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षा मिळू शकते. 

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी