शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना पाहून पळाला आणि जाळ्यात अडकला; चौकशीच सायकल चोर निघाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2022 20:57 IST

उत्तरप्रदेशचा सराईत सायकल चोर जाळ्यात, २७ सायकल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  गस्तीदरम्यान पोलिसांना पाहून पळाल्यामुळे पोलिसांनी पाठलाग करत तरुणाला पकडले. चौकशीत तो सराईत चोर असल्याचे समोर आले. रईस तावर खान (३८) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून विविध परिसरातून चोरी केलेल्या २७ सायकल जप्त करण्यास शाहू नगर पोलिसांना यश आले आहे.

    शाहू नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिम फाटक परिसरातील पादचारी पुलाखालील परीसरात पोलिसांना पाहून खानने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ त्याचा पाठलाग करत त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी करताच तो धारावीत राह्ण्यास असून मूळचा उत्तरप्रदेश येथील रहिवासी असल्याचे सांगितले. शाहू नगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट होताच त्याला चोरीच्या गुन्ह्यात अटक केली.

    त्याने, मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणाहून नामांकित कंपन्यांच्या सायकल चोरी करत शाहूनगर पोलीस ठाणे हद्दीतील सिटीझन बेकरी, एम्ब्रॉयडरी कारखाना, टेनरी कंम्पाउण्ड, शेठवाडी येथील आडोसा असलेल्या जागेत प्लास्टीकचा कपडा झाकून ठेवल्याचे सांगताच पथकाने अडीच लाख किंमतीच्या २७ सायकल जप्त केल्या आहे. त्याच्या विरोधात वांद्रे, खार, शिवाजी पार्क, डीबीमार्ग, विलेपार्ले, दादर पोलीस ठाण्यात एकूण ११ गुन्हे दाखल आहेत.            शाहू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  अशोक दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी