तुझ्या लहान बहिणीला उचलून नेऊ! फोनवर यायचे मेसेज; भावानं गळफास घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 09:54 AM2022-01-28T09:54:36+5:302022-01-28T09:56:11+5:30

सततच्या त्रासाला, धमक्यांना कंटाळून तरुणाची आत्महत्या; तीन आरोपींविरोधात तक्रार दाखल

up kanpur mobile message sister kidnapping threat youth commits suicide | तुझ्या लहान बहिणीला उचलून नेऊ! फोनवर यायचे मेसेज; भावानं गळफास घेतला

तुझ्या लहान बहिणीला उचलून नेऊ! फोनवर यायचे मेसेज; भावानं गळफास घेतला

Next

कानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. काही तरुण एका मुलाला मोबाईल ग्रुपमध्ये ऍड करून त्याच्या बहिणीला उचलून नेऊ अशा आशयाचे धमकी देणारे मेसेज करायचे. या धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल उचललं. त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. काही तरुणांकडून येत असलेल्या धमक्याच आतम्हत्येला कारणीभूत असल्याचा दावा मृताच्या कुटुबीयांनी केला. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली असून तपास सुरू केला आहे.

कानपूरमधील गजनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सैथा गावात वास्तव्यास असलेल्या कुशल दुबेनं गळफास लावून आत्महत्या केली. कुशल बीएससीचा विद्यार्थी होता. गावातच राहणारे तीन तरुण (भुल्लन, बिट्टी आणि धुन्नू) मोबाईलवरून धमकीचे मेसेज करायचे आणि कुशलला त्रास द्यायचे, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

तीन तरुणांकडून कुशलला सातत्यानं त्रास दिला जायचा. धमकीचे मेसेज पाठवले जायचे. कुशलच्या बहिणीसाठी ते अपशब्द वापरायचे. या त्रासाला कंटाळून कुशलनं आत्महत्या केली. आरोपी कुशलला अतिशय घाणेरड्या शब्दांत मेसेज करायचे. त्यामध्ये कुशलच्या बहिणीसाठी आक्षेपार्ह शब्द वापरलेले असायचे. गेल्या ६ महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. या त्रासाला कंटाळून कुशलला गळफास लावून घेतला.

आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी सैथा गाव गाठलं. पोलिसांनी कुशलच्या घरातून त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये आत्महत्येचं कारण नमूद करण्यात आलेलं आहे. कुशलच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून तीन आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांचा शोध सुरू आहे.

Web Title: up kanpur mobile message sister kidnapping threat youth commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.