शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा उन्नाव! होळीदिवशीच 9 वर्षीय मुलीवर बलात्कार; उपचारावेळी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 19:09 IST

मंगळवारी संध्याकाळी घराबाहेर ४०० मीटर अंतरावर मुलगी बेशुद्ध पडलेली पाहून ग्रामस्थांनी पोलिसांना कळविले.

ठळक मुद्देबलात्कारानंतर मुलीची गळा आवळण्यात आला होता. बलात्कारानंतर मुलीची गळा आवळण्यात आला होता.  मुलगी बेशुद्ध अवस्थेत गावच्या वेशीवर आढळली, तेव्हा परिसरात खळबळ उडाली.

उन्नाव - उन्नावच्या बिहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत होळीच्या दिवशी नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कारानंतर मुलीची गळा आवळण्यात आला होता.  मुलगी बेशुद्ध अवस्थेत गावच्या वेशीवर आढळली, तेव्हा परिसरात खळबळ उडाली. मंगळवारी संध्याकाळी घराबाहेर ४०० मीटर अंतरावर मुलगी बेशुद्ध पडलेली पाहून ग्रामस्थांनी पोलिसांना कळविले.पोलिसांना माहिती मिळताच एसपी, एएसपीसह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत मुलीला सीएचसी येथे दाखल करण्यात आले, तेथून तिला जिल्हा रुग्णालयात आणि नंतर कानपूर येथे हलविण्यात आले. मात्र, कानपुर हैलट रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मुलीचा अंत झाला. मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून अज्ञात लोकांवर बलात्कार आणि पॉक्सोसह इतर कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारी तीनच्या सुमारास काही जणांचं टोळकं माजी आमदाराच्या घराबाहेर पोहोचलं होतं. या टोळक्यात ९ वर्षांची मुलगी वडील आणि भावासोबत होती. वडिलांना पाणी पिण्यास सांगून ती मुलगी काही अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेल्या हँडपंपावर गेली आणि त्यानंतर ती बेपत्ता झाली. सुमारे तासभर ती परतला नाही तेव्हा शोधाशोध सुरू झाली. घराबाहेर सुमारे ४०० मीटर अंतरावर  इंदेमऊकडे जाणाऱ्या  मार्गाच्या प्राथमिक शाळेच्या मागील बाजूस मुलगी बेशुद्ध पडली होती. तिला पाहून ग्रामस्थांनी बलात्कार झाल्याची तिच्या कुटुंबातील सदस्यांना माहिती दिली. तिच्या अंगावर तशा खुणा दिसल्या. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक दाखल झाले आणि त्यांनी घटनेची माहिती वरिष्ठांना दिली.घाईघाईत मुलीला सीएचसी पाटन येथे दाखल केले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर कानपूर हैलट रुग्णालयात हलविण्यात आले.  हैलट रुग्णालय येथे मंगळवारी रात्री उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. रात्री उशिरा एसपी विक्रांतवीर, एसपी उत्तर व्ही.के. पांडे, सीओ अंजनी कुमार राय आणि बऱ्याच पोलीस रुग्णालयात दाखल झाले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान तीन तरुण संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. तपास करण्यासाठी  चार वेगवेगळी पथके स्थापना करण्यात आल्याची माहिती एसपी विक्रांतवीर यांनी दिली. या गुन्हाच छडा लवकरच लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Rapeबलात्कारMurderखूनPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल