शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीनेच पुसलं स्वतःच कुंकू! ४० हजारांची सुपारी देऊन पतीचा काटा काढला; 'असा' झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 09:35 IST

पतीच्या सततच्या नशेबाजीला आणि मारहाणीला कंटाळून पत्नीनेच त्याच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात घडलेल्या श्रीकांत हत्याकांडामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पतीच्या सततच्या नशेबाजीला आणि मारहाणीला कंटाळून पत्नीनेच त्याच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. केवळ ४० हजार रुपयांची सुपारी देऊन सुखरानी नावाच्या महिलेने आपल्या कुंकवाचा बळी दिला. पोलिसांनी याप्रकरणी पत्नीसह दोन सराईत शूटर्सना बेड्या ठोकल्या असून, एका 'कॉल डिटेल रेकॉर्ड'मुळे या गुन्ह्याचा छडा लागला आहे.

शेतात नेले अन् आवळला गळा!

चमरौली येथील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय श्रीकांत लोधी यांचा मृतदेह गुरुवारी एका शेतात हात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. श्रीकांतची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला हे प्रकरण अज्ञात हल्लेखोरांचे वाटत होते, मात्र श्रीकांतची आई सुंदारा यांनी सून सुखरानीवर संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

त्या 'दोन' फोन नंबरनी घात केला!

अजगैन पोलिसांनी तपास सुरू केल्यावर सुखरानीच्या फोनचे कॉल डिटेल्स तपासले. तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, सुखरानी दोन अनोळखी तरुणांच्या सतत संपर्कात होती. पोलिसांनी चमरौली-दौलतखेडा मार्गावर सापळा रचून सुखरानीसह अंकित यादव आणि मोहित सिंह या दोन आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच सुखरानीने आपला गुन्हा कबूल केला.

असा रचला हत्येचा कट

सुखरानीने पोलिसांना सांगितले की, श्रीकांत रोज दारू पिऊन तिला मारहाण करायचा. या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी तिने ४० हजार रुपयांत श्रीकांतला संपवण्याचा व्यवहार ठरवला. मंगळवारी तिने गोड बोलून श्रीकांतला राजेश नावाच्या व्यक्तीच्या शेतात नेले. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या अंकित आणि मोहितने श्रीकांतला गाठले, त्याचे हात बांधले आणि क्रूरपणे गळा आवळून त्याची हत्या केली.

आरोपी गजाआड

पकडण्यात आलेले शूटर अंकित आणि मोहित हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून हत्येसाठी वापरलेले मोबाईल आणि सुपारीच्या रकमेतील १०,९५० रुपये जप्त केले आहेत. सध्या या तिन्ही आरोपींची रवानगी तुरुंगात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Wife Murders Husband with Hired Killers Over Abuse; Case Solved

Web Summary : In Uttar Pradesh, a wife orchestrated her husband's murder due to constant abuse, paying killers ₹40,000. Police arrested the wife and two hitmen after call records revealed the plot. The husband was lured to a field and strangled.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यू