‘कोब्रा’द्वारे पत्नीचा खून; पोलिसांनी शून्यातून उभा केला खटला, न्यायालयाकडूनही कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 05:17 AM2021-10-17T05:17:51+5:302021-10-17T05:18:03+5:30

पतीला दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा

Unmasking the killer behind the cobra How Kerala cops cracked the case | ‘कोब्रा’द्वारे पत्नीचा खून; पोलिसांनी शून्यातून उभा केला खटला, न्यायालयाकडूनही कौतुक

‘कोब्रा’द्वारे पत्नीचा खून; पोलिसांनी शून्यातून उभा केला खटला, न्यायालयाकडूनही कौतुक

Next

- डाॅ. खुशालचंद बाहेती

तिरुवनंतपूरम - विषारी नागाचा शस्त्रा सारखा वापर करत पत्नीचा खून करणाऱ्या पतीला दोनवेळा जन्मठेपेची शिक्षा देणाऱ्या न्यायालयाने कोलम (केरळ) पोलिसांचे बहुतेक पुरावे मान्य केले. याच आधारावर पोलिसांनी पतीचा पत्नीला सापांचा शाप होता व यातून साप तिच्या मागावर होते व २ वेळा चावले हा अंधश्रद्धापूर्ण दावा उधळून लावला.

पोलिसांनी सादर केलेले पुरावे याप्रमाणे
उत्तराचा मृत्यू सर्पदंशाने झाला.
पहिल्या दंशानंतर उत्तराचे आई-वडील तिला माहेरी नेऊ इच्छित होते. त्यांनी तिचे दागिने परत करण्यास सांगितल्यानंतर पतीने रडून त्यांचा विश्वास मिळविला.
जानेवारी २० पासून पती इंटरनेटवर सापांची, सर्पमित्रांची माहिती मिळवत होता. यापैकी सुरेश या सर्पमित्रास प्रत्यक्ष भेटला.
पतीने सुरेश या सर्प मीत्रा कडुन साप पकडण्याचे प्रात्यक्षिक पाहिले व नंतर इंटरनेटवरून सर्प हाताळण्याचे कसब शिकला.
सुरेशकडून १० हजारात घोणस (साप) विकत घेतला .  १० हजार देताना, घोणस घेताना हजर असलेला साक्षीदार.
याच दिवशी सर्पमित्रासमोर पुन्हा एकदा स्वत: साप हाताळण्याचे प्रात्यक्षिक केले.
२७ फेब्रुवारी ला पतीने पायऱ्यावर साप ठेवून वरच्या मजल्यावरून मोबाईल आणण्यास उत्तराला सांगितले, पण साप पाहताच उत्तरा ओरडली. यानंतर पतीने सापास  पकडून पिशवीत ठेवले. हे कसब पाहून उत्तरालाही आश्चर्य वाटले.
३ मार्च रोजी ती झोपेत असताना उत्तराला सर्पदंश झाला त्यावेळी ती वरच्या मजल्यावर पलंगावर झोपली होती. हा दंश घोणसचा असल्याचा निष्कर्ष.
उत्तरा आयसीयुत असतानाही पतीचे इंटरनेटवर कोब्राची माहिती शोधणे. सर्प मित्राकडे कोब्राची मागणी करणे.
सर्पमित्र सुरेशकडून २४ एप्रिल रोजी कोब्रा विकत घेतला
सर्पमित्र सुरेश याने माफीचा साक्षीदार म्हणून दिलेला जबाब.
६ मे रोजी उत्तराला दंश झाला असतानाही सूरजचे सकाळी लवकर उठून  रुम बाहेर येणे व या बद्दल अनभीज्ञता दाखवणे 
दवाखान्यात कोणालाही माहीत नसलेले साप चावलेले ठिकाण पतीने डॉक्टरांना दाखवणे.
दोन्ही दंशाच्या वेळी सूरज उत्तरासोबत असणे
दोन्ही दंशाच्या वेळी उत्तराला गुंगीचे औषध देण्यात आल्याचा अहवाल.
सायबर तज्ज्ञांनी मोबाईलमध्ये शोधून काढलेले कोब्राचे फोटो.
कोब्रा ठेवलेली प्लास्टिक बरणी.
पतीचे प्रत्येक घटनेच्या वेळेचे असामान्य वर्तन.
उत्तरा दिव्यांग असल्याचे माहीत असूनही सूरजने तिच्याशी लग्न केले हे फक्त तिच्या वडिलांच्या संपत्तीच्या लोभापोटी.
 मोबाईल व टाॅवरचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड.

सर्पदंशाच्या खुणा असाधारण असल्याचा तज्ज्ञांचा अभिप्राय
एकाच वेळी दोन दंश
दोन्ही दंश जवळ जवळ
उत्तराचा मृत्यू रात्री २.३० वा. झाल्याचा अहवाल.
नेहमीपेक्षा मोठा चावा. साधारणपणे वरच्या व खालच्या दातांच्या खुणात १ ते १.६ सें.मी. अंतर असते. पण येथे २.३ ते २.८ सें.मी. होते. म्हणजेच तोंड उघडून हाताजवळ नेले होते.

सापाचा खोलीत नैसर्गिक प्रवेश नाही : सर्प तज्ज्ञांचा अहवाल
साप स्वत:च्या लांबीच्या १/३ शरीर वर उचलतो. १५२ सें.मी. चा कोब्रा ५० सें.मी. शरीर वर उचलू शकतो.
खोलीच्या खिडक्यांची उंची ११५ ते १२२ सें.मी. व्हेंटिलेटरची उंची २१० सें.मी.
दरवाजात २ ते ४ मी.मी.ची फट. यातून कोब्रा जाणे अशक्य.
कोब्रा कोणत्याही आधाराशिवाय भिंत, गुळगुळीत ड्रेनेज पाईपवर चढू शकत नाही.
घोणस पायरी किंवा पलंगावर चढू शकत नाही. उत्तराच्या पायावर दंश झाला त्यावेळी ती पलंगावर होती.

Web Title: Unmasking the killer behind the cobra How Kerala cops cracked the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app