शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना शाखा प्रमुखावर अज्ञातांचा गोळीबार; राजकीय वादातून गोळीबार झाल्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 13:33 IST

Bhiwandi : सुदैवाने या घटनेत शाखाप्रमुख व त्यांची पत्नी या हल्ल्यात बचावले असून राजकीय वादातून हा गोळीबार झाला असल्याचे बोलले जात आहे. 

- नितिन पंडीत

भिवंडी : भिवंडीत ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात असलेले काल्हेरचे शिवसेना शाखा प्रमुखावर मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. सुदैवाने या घटनेत शाखाप्रमुख व त्यांची पत्नी या हल्ल्यात बचावले असून राजकीय वादातून हा गोळीबार झाला असल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, या घटनेमुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दुचाकीवरील अज्ञात हल्लेखोरांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत. दिपक म्हात्रे असे गोळीबारात बचावलेल्या शिवसेना शाखा प्रमुखाचे नाव असून हा प्रकार त्याच्या घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीत काल्हेर गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख दिपक म्हात्रे हे उमेदवार असून मध्यरात्रीच्या सुमारास ते घरी येत असताना अचानक यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तीन वेळा गोळीबार केला. मात्र सुदैवाने या गोळीबारातून ते थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत दोघा अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 

विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वादातून काँग्रेसचे नगरसेवक मनोज म्हात्रे यांची हत्या झाली होती, त्यांनतर आता पुन्हा ऐन ग्राम पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत सेनेच्या शाखाप्रमुखवर गोळीबार झाल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेच्या तपासासाठी रात्रीपासूनच विशेष पोलीस पथक नेमून अज्ञात हल्लेखोरांचा तपास सुरू असल्याची माहिती नारपोली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र वाणी यांनी दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडीShiv Senaशिवसेना