शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हत्येची तारीख बदलल्याने वाचला काकाचा जीव; पुतण्याने रचला होता हत्येचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 16:50 IST

पोलिसांनी डाव उधळून केले सहा आरोपींना जेरबंद

ठळक मुद्देपोलिसांनी वेगवेगळ्या कलामांअन्वये आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.नालासोपाऱ्यातील बेकरीमध्ये काम करणाऱ्या फिरोज शराफत अन्सारी याला काकाच्या हत्येची २ लाख रुपयांची सुपारी देऊन 10 हजार रुपये ऍडव्हान्स दिले.

नालासोपारा - काकाची हत्या करण्यासाठी सुपारी देणाऱ्या पुतण्यासह सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटने जेरबंद करत हत्येचा डाव उधळून लावल्याची घटना घडली आहे. हत्येची तारीख बदलल्यामुळेच व्यापारी काकाचा जीव वाचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या कलामांअन्वये आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, एका व्यापाऱ्याच्या हत्येसाठी सुपारी देण्यात आली असून त्याची लवकर हत्या केली जाणार आहे. ही माहिती मिळाल्यानंतर वसई युनिटच्या टीमने वेगवेगळ्या ठिकाणांहून 6 जणांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यावर ही धक्कादायक व खरी माहिती उजेडात आली. नालासोपारा शहरात राहणारे रोशनलाल गुप्ता हे व्यापारी असून परिसरातील बेकऱ्या आणि अनेक दुकानांना होलसेल भावात तेल आणि मैदा पोहचवण्याचा व्यवसाय करत होते. त्यांचा पुतण्या मिथिलेश गुप्ता उर्फ मॉन्टी याचा सुद्धा हाच व्यवसाय असून तो याच परिसरात करत होता. काका आणि पुतण्या या दोघांमध्ये याच व्यवसायावरून वाद असल्याने भांडणे होत होती. काही महिन्यांपासून पुतण्या मिथिलेश हा आजारी असल्याने तो एका मांत्रिकाकडे गेला होता. त्या मांत्रिकाने सांगितले की, तुझ्या काकाने तुझ्यावर जादूटोणा आणि करणी केली आहे. ही गोष्ट माहिती मिळाल्यावर नाराज झालेल्या पुतण्याने काकाची हत्या करण्याचा डाव आखून हत्येची सुपारी देण्याचा विचार केला होता. त्याने नालासोपाऱ्यातील बेकरीमध्ये काम करणाऱ्या फिरोज शराफत अन्सारी याला काकाच्या हत्येची २ लाख रुपयांची सुपारी देऊन 10 हजार रुपये ऍडव्हान्स दिले. अन्सारीने हत्येसाठी मोहम्मद परवेज अन्सारी, अजय बिडलान, रिजवान जमाल खान आणि मंगलू गुप्ता त चार मित्रांना तयार केले. काकाला दाखवण्यासाठी पुतण्या या पाचही आरोपींना १ सप्टेंबरला नालासोपारा पूर्वेकडील विजयनगर येथे घेऊन गेला होता. त्या सर्वांना लांबूनच काकाला दाखवून हत्येसाठी तारीख आणि वेळ पुतण्याने ठरवली पण काहींना काही अडचण येत असल्याने अनेक वेळा हत्येच्या तारखा आणि वेळ बदली झाल्याने हत्या करण्यात आरोपींना यश आले नाही. यातच पोलिसांना माहिती मिळाल्यावर हत्येचा डाव उधळून 6 आरोपींना अटक करत व्यापारी काकाचा जीव पोलिसांनी वाचवला आहे.

 

व्यवसायातील वादामुळे आणि तांत्रिकाने करणी केल्याचे सांगितल्याने पुतण्याने काकाचा काटा काढण्याचा डाव आखून २ लाख रुपयांची ५ आरोपींना सुपारी दिली होती. हत्येचा डाव उधळून लावत ६ आरोपींना अटक केली आहे. त्यांना वसई न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - जितेंद्र वनकोटी (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर)

टॅग्स :ArrestअटकMurderखूनPoliceपोलिसVasai Virarवसई विरारbusinessव्यवसाय