लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : अल्पवयीन पुतणीवर चुलत काकानेच अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाल्यानंतर प्रकरणाचे बिंग फुटले असून पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी संबंधिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.शेगाव तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय मुलगी २८ नोव्हेंबर रोजी मामाच्या लग्नासाठी खामगाव येथे आली हाेती. यावेळी चुलत काकाने तिला मोटारसायकलवर बसवून माथणी येथे नेले. तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या प्रकरणाची माहिती पीडितेने तिच्या आईला दिली. मात्र, बदनामीच्या भीतीने प्रकरणाची वाच्यता टाळली गेली. दरम्यान, मुलगी गर्भवती राहिल्यामुळे अत्याचाराचे बिंग फुटले. पीडितेचा गर्भपात करण्याचाही प्रयत्न अकोला येथील स्त्री रूग्णालयात झाला. त्यानंतर पीडितेच्या आईने आरोपीविरोधात अकोला येथील रामदासपेठ पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि कलम ३७६(३) सहकलम बालकांचे लैंगिक संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला वळते करण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाला आहे.
अल्पवयीन पुतणीवर काकाचा अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 12:04 IST
Crime News मुलगी गर्भवती राहिल्यामुळे अत्याचाराचे बिंग फुटले.
अल्पवयीन पुतणीवर काकाचा अत्याचार
ठळक मुद्देमुलगी २८ नोव्हेंबर रोजी मामाच्या लग्नासाठी खामगाव येथे आली हाेती. चुलत काकाने तिला मोटारसायकलवर बसवून माथणी येथे नेले.तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.