शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मामानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; कर्जतमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 07:03 IST

ही अल्पवयीन मुलगी  वेणगाव येथील वीटभट्टीवर आपल्या कुटुंबासह गेली होती.

कर्जत : पोटल आंबेवाडी येथील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व त्यातून गर्भवती राहिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी  कर्जत पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार करणाऱ्या मामाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही अल्पवयीन मुलगी  वेणगाव येथील वीटभट्टीवर आपल्या कुटुंबासह गेली होती.

नोव्हेंबर २०२१ ते २६ मे २०२२ या कालावधीत त्या अल्पवयीन मुलीचे कुटुंब पोटल आंबेवाडी येथून वेणगाव येथे वीटभट्टीवर कामासाठी गेले होते. वेणगाव येथे गेल्यानंतर नात्याने मामा असलेल्या विवाहित तरुणाने सहा महिन्यांच्या कालावधीत अल्पवयीन मुलीबरोबर वीटभट्टीवरील झोपडीमध्ये बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. वारंवार असा अत्याचार करीत असताना त्या तरुणाच्या संबंधामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. 

या प्रकारची शंका आरोपीच्या पत्नीला आली होती. त्यामुळे त्यांनी त्या प्रकाराबद्दल आपल्या नवऱ्याला विचारले असता त्याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच झालेला प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. परंतु, १२ वर्षीय मुलीच्या आईला ही माहिती मिळताच तिने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणKarjatकर्जत